महाराष्ट्रात हिंदीभाषा सक्तीचा अध्यादेश रद्द झाल्याचा अभिमान आहे. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हारली आहे. पक्षभेद विसरून सर्व जण एकत्र आले. सरकारने मराठी माणसाची एकजूट फोडायची आहे. मराठी आणि अमराठी, असा वाद करून, अमराठी माणसांची मतं भाजपकडे खेचून घ्यायचा हा छुपा डाव होता. मराठी माणसांनं एकत्र येऊ नये म्हणून, अध्यादेश रद्द केला. भाजप खोट्यांची फॅक्टरी, अफवा पसरवणारी फॅक्टरी आहे. खोट्या मार्गाने विजय प्राप्त करण्याचा भाजपचा धंदा आहे. पाच मार्चला मोर्चाऐवजी जल्लोष, सभा काय करायचं, हे लवकरच सांगतो, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.
हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द झाल्याने मराठी एकजुटीचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहाणपणाचा हा निर्णय छान आहे. ठाकरे एकत्र येणार असल्याचा धसका राज्यातील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड! असे ट्विट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द केल्याचे जाहीर केले. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री काळात घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवलं. त्याला उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आठ वाजता पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पाच मार्चला ठाकरे बंधू मोर्चा काढणार का? यावर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्याने कोणीही मोर्चा काढू नये. हा निर्णय रद्द झाल्याने मोर्चा काढला तरी त्यांना कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.
त्रिभाषा सुत्रासंदर्भात डाॅ. नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली नवीन समिती गठीत करण्याची घोषणा करताना, पूर्वीचे हिंदी आणि इंग्रजी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाला आल्यानंतर भाषासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हिंदी भाषेवरून ठाकरे बंधू काढत असलेल्या मुंबईतील (Mumbai) मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. इंग्रजी आणि हिंदी पहिलीपासून सक्ती करण्यात यावी, असा अहवाल ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या काळात 18 जणांच्या समितीनं दिला असल्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलं.
हिंदी हिंदू (Hindu) आणि हिंदुत्व हाच भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे आणि त्यासाठीच हिंदी सक्तीची केली जात आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या चालकांच्या नावावर बेनामी संपत्ती आहे, असा गंभीर आरोप 'AIMIM'चे इम्तियाज जलील यांनी केला. संदिपान भुमरे यांचे प्रकरण बाहेर निघाल्याने संजय शिरसाट खुश झाले आहे, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले.
राहुरी पोलिस (Police) पथकाने दोन लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तिघांना सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि उपनिरीक्षक संदिप मुरकुटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे (Pune) जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आंबेगाव तालुक्याचे विद्यमान तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा तडा जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, ते कशासाठी, तर मुंबई (Mumbai) महापालिका जिंकण्यासाठी हे एकत्र येत आहेत, असा टोला शिवसेना मंत्री योगेश कदम यांनी लगावला. आम्ही हिंदी सक्ती केलेली नाही. ठाकरे बंधूंचा हा सत्तेसाठी खटाटोप सुरू आहे. मोर्चासाठी परवानगी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दिली जाणार आहे, असेही मंत्री कदम यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.