Maharashtra Political Live Updates : भाजप आमदार संजय कुटे यांच्या चालकाचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा पत्नीचा आरोप

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Pankaj Deshmukh
Pankaj DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Buldhana Politics Update : भाजप आमदार संजय कुटे यांच्या चालकाचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा पत्नीचा आरोप

जळगाव जामोद इथं भाजप (BJP) आमदार संजय कुटे यांचा कारचालक तथा कार्यकर्ता पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनीही म्हटलं होतं. मात्र पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. सुनीता देशमुख यांच्या मागणीला सर्व पक्षांनी पाठिंबा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.

Maharashtra Forest Department : नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांचं निलंबन; 1 कोटी 13 लाखांच्या वित्तीय अनियमीततेचा ठपका

Snehal Avsarmal
Snehal AvsarmalSarkarnama

सरकारी नियम धाब्याबर बसवत स्वत:च्या खात्यावर सरकारी धनादेश वटवून त्यातून ठेकेदारांना पैस अदा करत वित्तीय अनियमीतता करणाऱ्या नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी ही कारवाई केली. स्नेहल अवसरमल यांच्यावर सुमारे 1 कोटी 13 लाखांची वित्तीय अनियमीततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वनदिनी वनमंत्र्यांच्या हस्ते स्नेहल अवसरमल यांना सुर्वणपदक देवून गौरविण्यात आलं आहे.

Mumbai Train Accident : मुंबईत मोठा अपघात; ट्रेनमधून बाहेर पडलेल्या पाच प्रवाशांचा मृत्यू, तर सात गंभीर जखमी

मुंबईमध्ये (Mumbai) एका विचित्र अपघातामध्ये अनेक प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. 'पुष्पक एक्सप्रेस'मधून 10 ते 12 प्रवासी खाली पडले असून, त्यापैकी पाच प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Local Body Elections : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची 'स्थानिक'साठी जोरदार बांधणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते आणि पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पदाधिकाऱ्यांची करमाळा इथं बैठक होऊन, स्थानिकसाठी जोरदार तयारी करण्याचा निश्चय करण्यात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आमदार नारायण पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.

Maharashtra State Road Transport : एसटी महामंडळाच्या जागांच्या खासगीकरणास विरोध

राज्य परिवहन महामंडळाचे कर्जाच्या खाईत रुतलेले आर्थिक चाक बाहेर काढण्यासाठी मोठ्या शहरातील एसटी महामंडळाला मालकीच्या बस स्थानक आणि आगारांच्या जमिनीत खासगी व सार्वजनिक भागीदारातून विकसित करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या प्रस्तावाला एसटी कामगार संघटनांनी विरोध केला आहे. एसटी महामंडळावर सात हजार कोटी रुपयांची विविध प्रकारांची देणी आहेत.

Fixing Allegation Maharashtra Elections : राहुल गांधींची अधिकृत तक्रार किंवा पत्र नाही; निवडणूक आयोगाची भूमिका

Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये फिक्सिंग झाल्याच्या आरोपांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून अद्याप तक्रार किंवा भेटीसाठी वेळ मागितली नसल्याची तक्रार आलेली नाही, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. तर उत्तर देण्याचे टाळून निवडणूक आयोग आयोग आपली विश्वासार्हता गमावत असल्याचा पलटवार राहुल गांधी यांनी केला.

Akole Shivsena : अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेतील वाद शिगेला; दोन गटाच्या वेगवेगळ्या बैठका

अकोल्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह थांबायला तयार नाही. जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरीया गटाने मेळावा घेतला, तर आता दुसरे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले गटाने बैठक घेतली. बाजोरीया गटाच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली होती. हाच धागा घरत अकोला पश्चिम अकोला पूर्व दोन्ही विधानसभा क्षेत्रातील सर्व निवडणुकांमध्ये व संघटनात्मक बांधणी करतांना काम करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही, अशा शब्दात पिंजरकर-नवले गटाने स्पष्ट करत बाजोरीया गटावर पलटवार केला.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलक; जमावबंदी अन् इंटरनेट सेवा बंद

मैतई समाजाची संघटना असलेल्या अराम्बाई टेंगलच्या नेत्याला अटक झाल्यानंतर मणिपूरमध्ये (Manipur) हिंसक आंदोलनाला पुन्हा सुरूवात झाली आहे. राज्य प्रशासनाने इम्फाळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जमावबंदीसह इंटरनेट सेवा देखीलबंद करण्यात आली आहे.

Amit Shah : तामिळनाडू अन् पश्चिम बंगाल पुढील वर्षी आमचेच सरकार; अमित शाह यांचा दावा

Amit Shah
Amit ShahSarkarnama

तामिळनाडू अन् पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला. तमिळनाडूमधील मदुराई इथं भाजप पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. तमिळनाडूमधील द्रमुकला सत्तेतून बाहेर घालवलं जाईल, असं इशारा अमित शाह यांनी दिला.

Harshwardhan Sapkal : निवडणूक अधिकाऱ्यांची 'नार्को टेस्ट' करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर काँग्रेस (Congress) नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची मिरची भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झोंबली आहे. त्यांचा खुलासा जनतेला भ्रमित करणारा आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com