उद्धव ठाकरेंना निवडणुकीचा निकाल लागल्यावर साक्षात्कार कसा झाला? राज कडाडले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्यासपीठावर बसलात, भाषण केली, तेव्हा कधी सांगितल नाहीत, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल. (Raj Thackeray)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात आपण बऱ्याच गोष्टी विसरलो. चॅनल, वर्तमान पत्रांनी तुम्हाला नव्या गोष्टी सांगितल्या दाखवल्या आणि तुम्ही विस्मृतीत गेलात. (Raj Thackeray Melawa Shivaji Park) तुम्ही विसरता म्हणून यांच फावत, म्हणून मी तुम्हाला फ्लॅश बॅकमध्ये नेणार, असे सांगत राज ठाकरे (MNS) यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केल्यानंतर राज ठाकरे यांची तोफ धडाडली ती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर. (Mumbai)

राज ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीकडे घेऊन जातो. शिवसेना- भाजप विरुद्ध काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांविरुद्ध लढले. निकाल जाहीर झाला आणि उद्धव ठाकरेंच्या असे लक्षात आले की आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही आणि मग त्यांनी एक टूम काढली. म्हणे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचे काय झाले? उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हा साक्षात्कार केव्हा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्यासपीठावर बसलात, भाषण केली, तेव्हा कधी सांगितल नाहीत, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल. अमित शहा, मोदी आपल्या प्रत्येक भाषणातून सांगायचे की राज्यात भाजपची सत्ता आली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, मग त्यावेळी गप्प का होतात? म्हणे अमित शहा आणि माझ एकांतात बोलणं झालं. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा एकातांत का? असा सवाल करत ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्या मतदारांचा तुम्ही अपमान केलात? असा हल्ला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला.

राज ठाकरे यांच्या गुडीपाडव्याच्या मेळाव्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. रात्री ८ वाजून दहा मिनिटांनी राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाले. `जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो`, या आपल्या नेहमीच्या शैलीत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. जमलेल्या गर्दीला गुडीपाडव्याच्या आणि हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देत कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला.

रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता, पोलिसांच्या दांडिया सुरू होत्या. पण त्यांचाही नाईलाज होता. कोरोना काळात मुंबई आणि महाराष्ट्रातील जीवाची पर्वा न करता काम केले, आपल्या कोरोना होईल याची भिती न बाळगात २४ तास पोलिस रस्त्यावर होते, असा उल्लेख करत त्यांनी मुंबई आणि राज्याच्या पोलिसांचे आभार मानले. गेल्या दोन वर्षात खूप साठलंय आज ते मोकळं कारायचंय, अस सांगत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली.

तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष यांना नाचवतोय..

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचा उल्लेख करतांना राज ठाकरे म्हणाले, राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाच्या शिवसेनेला, भाजपला आपल्या बोटावर नाचवतोय. तो पहाटेचा शपथविधी आठवा, सकाळी भलतंच काहीतरी पहायला मिळालं असा उल्लेख करत पळून कुणाबरोबर आणि लग्न तिसऱ्याशीच असा टोला देखील राज ठाकरे यांनी यावेळी लगावला. अजित पवार यांची नक्कल देखील त्यांनी यावेळी केली.

MNS Chief Raj Thackeray
Amit Deshmukh : मांजरा परिवारात निलंगेकर कारखाना सरस ठरेल ; ऑक्टोबरमध्ये गाळप

राज ठाकरे यांचे ठीक ८ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. कपाळावर कुंकू आणि पांढरा कुर्ता आणि झब्बा असा त्यांना नेहमीचा पेहराव होता. व्यासपीठावर येताच राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. राज ठाकरे स्थानपन्न झाले तेव्हा बाळा नांदगावकर यांचे भाषण सुरू होते. महाराष्ट्र धर्माची प्रतिकात्मक गुढी देऊन माहिम मनसे शाखेच्या वतीने राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भगवी शाल देखील देण्यात आली.

शिवाजीपार्कवर मनसे चा गुढीपाडवा मेळावा जल्लोषात सुरू झाला. या मेळाव्याची जय्यत तयारी मनसेकडून करण्यात आली होती. महाराष्ट्र धर्माची सर्वोच्च गुढी उभारूया, अशी बॅनरबाजी संपुर्ण मुंबईत करण्यात आली होती. राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

सभेच्या काही तास आधीपासूनच मनसे सैनिक शिवाजी पार्कच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली होती. राज ठाकरेंच्या मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेता ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली. हिंदुत्व,मराठी भाषेचा मुद्दा, राजकीय नेत्यांवरील केंद्रीय तपास यंत्रेणेचे छापे या प्रमुख मुद्द्यांवर राज ठाकरे यांची तोफ धडकण्याची शक्यता वर्तवली जात होती.

साधारण दोन वर्षांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची ही राजकीय सभा आहे. त्यामुळे ते नेमकं कोणत्या विषयाला हात घालतात, कोणावर निशाणा साधतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. केवळ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकच नाही तर मराठवाड्यातून देखील मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर धडकले आहेत.

व्यासपीठावरील सगळ्या नेत्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. राज ठाकरे शिवाजी पार्कवर येण्याआधी काही नेत्यांची भाषणे झाली. या सर्व नेत्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूजननायक, तर अमित ठाकरे यांचा तरुण ह्दयसम्राट असा केला. ठाकरे यांच्या सभेची वेळ गर्दीत अडकलेल्या मनसैनिकांना शिवाजी पार्कवर पोहचा यावे, यासाठी सभेची वेळ रात्री ८ वाजता ठेवण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com