मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहतांचा फ्लॅट आयकर विभागाकडून जप्त

मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव अजोय मेहता (ajoy mehta) यांच्यावर आयकर विभागाने (income tax department) 'बॉम्ब' टाकला आहे. आयकर विभागाने मेहतांचे घर जप्त केलं आहे.
ajoy mehta
ajoy mehtasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडण्यास सुरवात झाली असताना आता मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव अजोय मेहता (ajoy mehta) यांच्यावर आयकर विभागाने (income tax department) 'बॉम्ब' टाकला आहे. आयकर विभागाने मेहतांचे घर जप्त केलं आहे. अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सल्लागार आहेत.

मूळ बाजार मूल्यापेक्षा कमी किंमतीत अजोय मेहता यांनी हे घर विकत घेतल्याचा आयकर विभागाने केला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांची बेनामी संपत्ती म्हणजे मेहतांचे याचे घर असल्याचा संशय आयकर विभागाला आहे.

अजोय मेहतांनी ज्या शेल कंपनीकडून हे घर घेतले आहे., ती शेल कंपनी अविनाश भोसले यांच्या मालकीची असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. मंत्रालयाजवळ ही इमारत आहे.

एका शेल कंपनीकडून अजोय मेहता यांनी हा फ्लॅट 5.33 कोटींना विकत घेतला. या फ्लॅटचे बाजारमूल्य 10.62 कोटी रूपये आहे.अनामित्रा प्रॉपर्टीज प्रा. लि. या शेल कंपनीकडून हा फ्लॅट त्यांनी विकत घेतला आहे. मंत्रालयाजवळ नरीमन पॉईंट भागात ही इमारत आहे.

ajoy mehta
देगलूर -बिलोली पोटनिवडणूक : कॉग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर

मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना अजोय मेहता यांनी JVLR ते महाकाली लेण्यांना जोडणाऱ्या सध्याच्या तीस फूट रस्त्याच्या विकासाचे अधिकार देण्याबाबत अविनाश भोसलेंच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी विकास आराखड्यात असलेल्या सुविधा किंवा रस्त्यांवर टीडीआर देण्याची तरतूद नसल्याचा युक्तिवाद बीएमसीच्या मुख्य अभियंत्यांनी केला असतानाही विकास हक्कांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असल्याचे आयकर विभागाने तपासात म्हटलं आहे.

थकीत वीजबिलाबाबत सहकारमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा

कडूस (पुणे) : राज्याचे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजेची थकबाकी वसुली करण्यासंदर्भातील महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी साखर कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भातील पत्रक काढलं होतं. या बाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांनी खुलासा केला आहे. कडूस येथे राजगुरूनगर सहकारी बँकेच्या (Rajgurunagar Co-operative Bank) शाखा नूतनीकरण समारंभासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण केलं आहे. ''शेतकऱ्यांची वैयक्तिक लेखी संमती असल्याशिवाय साखर कारखाने, सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वीज बिलाची थकीत वसुली होणार नाही,' असा दिलासा बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यावेळी आमदार दिलिप मोहिते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com