SushilKumar Shinde : 'आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक'; सुशीलकुमार शिंदेंचा काँग्रेसला सल्ला

In his autobiography written by Sushilkumar Shinde, praise of Swatantra Veer Savarkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या 'फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कौतुक केलं आहे.
SushilKumar Shinde
SushilKumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये नेहमीच संघर्ष राहिलाय. भाजप आणि काँग्रेस यावरून टोकाचे राजकारण रंगते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर काँग्रेस नेहमीच प्रश्नचिन्हं उपस्थित करते.

काँग्रेसविरुद्ध आक्रमक होताना, महात्मा गांधींपासून काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांच्या देशभक्तीवर भाजप देखील हल्ला चढवते. पण महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक केल्याचं समोर आलं आहे. यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक केलं आहे. सुशीलकुमार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक केल्यानं काँग्रेसची कोंडी झाली आहे. "अस्पृश्यता आणि जातीवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मुख्य प्रयत्न होते. सावरकर विज्ञानवादी होते आणि सारवकरांचे संकुचित विचार हे आव्हानच आहे. काँग्रेसची विचारसरणी सुधारण्याची गरज आहे", असे परखड मत सुशीलकुमार शिंदे यांनी आत्मचरित्रात मांडलं आहे.

SushilKumar Shinde
Amit Shah : मित्रपक्षांना जिंकवा, असे सांगण्याची वेळ अमित शाह यांच्यावर कुणी आणली?

सुशीलकुमार शिंदे यांचं 'फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' नावाचं आत्मचरित्राचं प्रकाशन झालं आहे. या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कौतुक केल्यानं काँग्रेसची कोंडी झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी असलेले मत सर्वश्रुत असून, यावर ते नेहमीच भाजप (BJP) आणि संघ परिवाराशी संघर्ष करतात. परंतु सुशीलकुमार यांच्या परखड मतांची आता काँग्रेसमध्ये चर्चा रंगली आहे.

SushilKumar Shinde
Sharad Pawar Vs chhagan Bhujbal: शरद पवार येवल्यात मोठा धमाका करणार? भुजबळांविरोधातला 'मोहरा' ठरला?

सुशीलकुमार यांनी आत्मचरित्रात काय म्हटलंय

"माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे. त्यामुळे 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो. सावरकरांना पाठिंबा दिल्याच्या मुद्यावर मी ठाम राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातील असलेल्या सावरकरांच्या प्रयत्नांने मला विशेष महत्त्वं वाटते. सावरकरांचा मुद्दा निघाला की, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर का भर दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलु आहेत.

सावरकरांमधला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का?, वास्तविक सामाजिक, समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले. सावरकरांचे संकुचित विचार हे आपल्यासमोर एक आव्हान आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com