'अंबानी' प्रेम उघड! महाराष्ट्रातील एकमेव कॅम्पमधील हत्ती 'रिलायन्सला भेट'

13 elephants to mukesh ambani : हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्सच्या प्राणी संग्रहालयात
mukesh Ambani
mukesh Ambani Sarkarnama
Published on
Updated on

गडचिरोली : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या जामनगर प्राणी संग्राहलयाच्या सौंदर्यतेमध्ये आता आणखी भर पडणार आहे. महाराष्ट्राच्या वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्सच्या प्राणी संग्रहालयात हलविण्यात येणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यासाठी राज्याच्या वनविभागाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील पाळीव हत्ती असलेले महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाचा नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील जामनगर भागात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारण्यात येत आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या केंद्रीय प्राणी प्राधिकरणाकडून १२ फेब्रुवारी २०१९ रोजी या प्राणी संग्रहालयास मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास २५० एकरांवर पसरलेल्या या नविन प्राणी संग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ प्राणी नेण्यात येणार आहेत.

mukesh Ambani
सरपंच अन् प्रांताधिकाऱ्यांना बेईमानी महागात! ५.५० लाखांची लाच स्वीकारताना अटक

यापुर्वी २०२० मध्येच गुजरातमधील दुर्मिळ १२ चित्यांना या प्राणीसंग्रहालयात हलविण्यात आले आहे. यानंतर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आता महाराष्ट्रातील येथील एकमेव पाळीव हत्ती कँम्पमधील एकूण १३ हत्तींना नेण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र गडचिरोलीचे प्रादेशिक वनसंरक्षक यांना राज्याच्या वनविभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार हे हत्ती पाठविण्यात येणार असून या हत्तींना २ गटात नेण्यात येणार आहे. पहिला गट या महिन्यात स्थानांतरित केला जाणार आहे.

mukesh Ambani
सरकारनामा आपल्या वॉर्डात : बालेवाडी टॅकरमुक्त दाखवा अन्‌ पाच लाख रूपये मिळवा !

या हत्तींच्या स्थानांतरणाचे काम रिलायन्स राधे क्रिष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट करणार आहे. मागच्या काही वर्षांपूर्वी या हत्ती कॅम्पला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले. पाळीव हत्ती असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव हत्ती कॅम्प आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आणि शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधून या हत्तींना पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ लागलेली असते. मात्र आता येथील हत्तींना गुजरातला हलविण्यात येणार असल्याने या ठिकाणच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com