CM Eknath Shinde News : जरांगेंनी सहकार्य करावे, आम्ही मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही..

Jarangs should cooperate, Chief Minister Shinde says we will not mislead the Maratha community : कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता दहा टक्के आरक्षण सरकारने दिले. त्याच्या विरोधात आज कोण न्यायालयात गेला ते पहा. आतापर्यंत पाच हजार मराठा मुलांना नोकरी दिली आहे.
Manoj Jarange On CM Eknath Shinde
Manoj Jarange On CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार नाही, आम्ही जे बोलतो ते करतो. ओठात एक पोटात एक अशी आमची भूमिका नाही. कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देऊन दिलेला शब्द सरकार पाळणार, असा शब्द पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे आले होते.

काल (ता.16) मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केले आहे. सरकारला इशारे देत असतानाच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत सरकारची भूमिका स्पष्ट केली. सग्या-सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत काही आक्षेप आले होते. शासनाने न्या. शिंदे यांची कमिटी स्थापन केली आहे, त्यावर काम सुरू आहे. कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहे, हे सर्वांत मोठे यश आहे.

कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता दहा टक्के आरक्षण सरकारने दिले. त्याच्या विरोधात आज कोण न्यायालयात गेला ते पहा. आतापर्यंत पाच हजार मराठा मुलांना नोकरी दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातून एक लाख जणांना बिनव्याजी कर्ज देऊन रोजगार निर्माण केला. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत, पण त्यांनी आता सहकार्य करावे. आरक्षण देण्याची मोठी संधी असतानाही, त्यांनी ते आरक्षण दिले नाही त्यांना जाब विचारा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Manoj Jarange On CM Eknath Shinde
Manoj Jarange Patil : जरांगे-पाटील राजकीय वक्तव्य करणार नाहीत; मात्र शिंदे सरकारसमोर ठेवली 'ही' अट

महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलाही संघर्ष नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत समन्वयाने बोलणी सुरू आहे. (Eknath Shinde) इतिहासात कधी नव्हते एवढे निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत. त्या जोरावर जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजना ही सर्वांत यशस्वी योजना आहे. त्यात खोडा घालण्याचे काम काहीजण करत आहेत.

महिलांना आमिष दाखवीत आहेत. न्यायालयात जाऊन विरोध केला जात आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणी जोडा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला. नुसती लाडकी बहीण नाही तर लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी देखील आहे. त्यामुळे सोयाबीनला पाच हजारांचा भाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com