NCP News : शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी कोणताही विचार न करता आश्वासने दिले. त्याची पूर्तता करण्यासाठी राज्यासमोर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. मात्र, शासनावर 9.50 लाख कोटीचे कर्ज आहे. आगामी काळात ते 20 टक्के पेक्षा अधिक होईल. लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटले. आता अडीच कोटी वरून केवळ 50 ते 60 लाख बहिनींनाच शासनाला लाभ द्यायचा आहे. ही लाडक्या बहिनींची फसवणूक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केला.
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्हा व शहर कार्यकारिणी, पदाधिकार्यांच्या बैठक घेत संघटनात्मक आढावा घेतला. काही नवीन पदाधिकार्यांची निवडही केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागाचा निधी परस्पर वळता केल्याच्या प्रकारावर त्यांनी या विभागाचा निधी निश्चित केलेला असतो.
त्यात बदल करता येत नाही. तसे झाले असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय गेल्यास ते यावर तोडगा काढतील, असे सांगितले. (NCP) मी पक्षात आनंदी आहे, लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले, मात्र, विधानसभा निवडणुकीत तसे झाले नाही. याचे दु:ख आहेच. पण फार दिवस दु:खी राहता येत नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी आपल्याबद्दल सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चा या अफवा असल्याचे स्पष्ट केले.
अजितदादांना संधी मिळाली तर आनंदच..
राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. यात नुकतेच मला मुख्यमंत्री व्हायचं पण योगच येत नसल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. याबद्दल विचारले असता पाच वर्ष आमचा कोणाचा विषयच नाही, या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे तीन नेते त्या-त्या पक्षाचे नेते आहेत. या तिघांमध्ये अजितदादांना संधी मिळाली तर आपणास आनंदच आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.
विधानसभेच्या उमेदवारीसाठी मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी ऐनवेळी पक्षात प्रवेश केला. पक्षानेही त्यांना उमेदवारी दिली यामुळे एकनिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा पक्ष सोडून अजित पवारांकडे गेले, याकडे जयंत पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर सतीश चव्हाण यांच्या पक्षात येण्या आणि परत जाण्यामुळे नाराजी असल्याची कबुली दिली. यापुढे उमेदवारांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणार असल्याचे सांगत पाटील यांनी वेळ मारून नेली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.