मुलीचे लग्न अन् जितेंद्र आव्हाडांच्या तोंडी महाविकास आघाडीच्या गतिमानतेचे कौतुक

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कन्या नताशा (Natasha Awhad) यांचा विवाह आज अत्यंत साधेपणाने पार पडला.
jitendra Avahad daughters marriage
jitendra Avahad daughters marriage Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कन्या नताशा (Natasha Awhad) यांचा विवाह आज अत्यंत साधेपणाने पार पडला. जितेंद्र आव्हाड यांच्या घरी रजिस्टर्ड पद्धतीने हे लग्न पार पडले. नताशा यांचा विवाह त्यांचा बालमित्र अॅलन पटेल (Alan Patel) यांच्या समवेत झाला. सोहळ्यानंतर मुलीचे वडील म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड अत्यंत भावूक झाले. मात्र आपल्या मुलीच्या लग्नातही ठाकरे सरकारच्या गतिमानतेचे कौतुक करायला आव्हाड विसरले नाहीत.

त्याचे झाले असे की, आव्हाड यांच्या घरीच रजिस्टर लग्न करण्याचे अंतिम झाल्यानंतर संबंधित तयारी करण्यात आली. त्यावेळी सह्या झाल्याबरोबर दोघांनाही तात्काळ प्रमाणपत्र मिळाले. त्यावर उपस्थितांना आश्चर्य वाटले. यावेळी उपस्थित असलेल्या एकाने गतिमान सरकार अशी कोपरखळी मारली. यावर उत्तर म्हणूनही आव्हाड यांनी त्याच अभिमानात कौतुक करत म्हणाले, बघितले का महाविकास आघाडीचे गतिमान सरकार? त्यावर एकच हशा पिकला.

jitendra Avahad daughters marriage
संजय जगतापही बिनविरोध : वळसे पाटलांपोठापाठ आणखी एका जागेचे टेन्शन कमी

मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना भावूक झालेले जितेंद्र आव्हाड म्हणाले, २५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे, एका बापाने अशावेळी काय बोलायचे? कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार. घरातील घरपण गेल्यासारखं असेल, अशा भावनाही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.

jitendra Avahad daughters marriage
दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

अॅलन पटेल-नताशा हे दोघेही बालमित्र आहेत. इयत्ता पहिली पासूनच ते एकत्र शिकत होते. नताशाचे शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये तर अॅलनचे एमएस अन फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. अॅलन पटेल स्पेनमधली मल्टीनॅशनल कंपनीत सर्व्हिस करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com