Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे महायुती बॅकफूटला आली आहे. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर उमेदवार न देता महायुतीचा प्रचार त्यांनी केला होता.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली. (Jitendra Awhad News)
गेल्या काही दिवसापासून भूमिका बदलने हे राज ठाकरेंच्या रक्तात आहे. त्यांचे वडील श्रेष्ठ गीतकार होते. त्यांनी चांगली गाणी लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगात कला आहे. ते कधी ‘बॉम्बे टू गोवा' मध्ये कधी अमिताभच्या भूमिकेत असतात. कधी ते ‘दिवार’मधील अमिताभची भूमिका करतात. कधी ते ‘शोले’ मधला रोल करतात. त्यामुळे ते नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत असतात. राजकारणाला ते चित्रपट समजतात, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी केली.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्येही त्यांची आणखी काही वेगळी भूमिका असेल. अभिनेते कसे त्यांची भूमिका चित्रपटानुसार बदल असतात. त्याप्रमाणे नेहमीच राज ठाकरे अभिनेते आहेत, त्यामुळे त्यांचा भूमिका बदलण्यावर भर असतो, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीपूर्वी आम्हालाही वाटले होते की दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर बरे झाले असते. राज ठाकरे हे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवत असले तरी महायुतीवर दबाव वगेरे काही आणत नाहीत.
मराठी मते तुम्ही फोडा असे सगळं हे ठरवून आहे. आता सगळे सर्व्हे येत आहेत ते सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात येत आहेत. त्यांच्याकडून करण्यात येणारी सर्व्हे ते देखील त्यांच्या विरोधात येत आहेत. त्यामुळे अशी प्यादी वापरायची, अशी भाजपची सवय आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.