Karuna Shrama : करुणा शर्मांचा नवा बॉम्ब; धनंजय मुंडेंचं 'अंतिम मृत्यूपत्र' कोर्टात सादर

Karuna Sharma latest News :करुणा शर्मांनी नवा बॉम्ब टाकत धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे म्हटले आहे.
Dhananjay Munde Karuna Sharma
Dhananjay Munde Karuna Sharmasarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा यांनी कोर्टात खटला दाखल केला आहे. त्यावर वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी करुणा शर्मा यांच्यातर्फे लग्नासंदर्भातील काही पुरावे सादर केले.

त्यांनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी फेटाळत करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नव्हत्या, त्यांच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर करुणा शर्मांनी नवा बॉम्ब टाकत धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर केले. त्यामध्ये करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे म्हटले आहे. या सादर केलेल्या पुराव्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार आहेत.

सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र कोर्टात सादर करण्यात आलं आहे. त्यामध्ये करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे म्हटले आहे. तर चार मुलांच्या नावाचाही उल्लेख आहे. सादर करण्यात आलेलं मृत्यूपत्र हे खरं असल्याचा दावा करत ते ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी करुणा शर्मा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Dhananjay Munde Karuna Sharma
BJP Politics: सावकारी करणारा भाजप नेता म्हणतो, " सरकार उलथवण्यासाठीचे ते ६०० खोके माझ्याकडेच होते"

धनंजय मुंडे यांचे अंतिम मृत्यपत्र करुणा शर्मा यांच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आले तर करुणा शर्मा यांनी सादर केलेले मृत्यूपत्र हे खोटं असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांच्याकडून कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करण्यात आले. मात्र हे सर्व पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले. त्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रं खोटी आहेत असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

Dhananjay Munde Karuna Sharma
Devendra Fadnavis : पुण्यात पाऊल ठेवताच सीएम फडणवीसांनी आंदोलकांना ठणकावले; म्हणाले, 'आता बस झालं....'

दरम्यान, मुंबई कनिष्ठ न्यायालयाने करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु करुणा शर्मा यांनी दर महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी मागितली. त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे देण्याचे आदेश दिले होते. ते पुरावे करुणा शर्मा यांच्याकडून दाखल करण्यात आले.

Dhananjay Munde Karuna Sharma
MNS Marathi issue: वातावरण तापणार! मराठीच्या मुद्द्यावरून मनसेपाठोपाठ उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; राज्य सरकारची भूमिका काय?

दरम्यान, याबाबत बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागेल, याची मला खात्री आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानंतर त्यांचे वकील हादरले आहेत. १९९६ पासून करुणा शर्मा त्यांच्या पत्नी असल्याचे पुरावे दिले आहेत. त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र २०१६ मधील आहे. त्यात त्यांची सही आणि अंगठा आहे. त्यातही करुण शर्मा पहिली पत्नी म्हटले आहे. १९९६ पासूनची सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात पोसपोर्ट, मुलांचे जन्मदाखले आणि इतर सर्व काही आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केलेले अपील न्यायालय फेटाळेल, असा विश्वास करुणा शर्मा यांनी केला.

Dhananjay Munde Karuna Sharma
Manikrao Kokate : कृषिमंत्रीसाहेब, पोशिंद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे धाडस कुठून आले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com