राष्ट्रवादी अन् शिवसेना आमनेसामने; आदिती तटकरे म्हणतात...

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत.
Aditi Tatkare

Aditi Tatkare

sarkarnama

Published on
Updated on

पाली (जि. रायगड) : रायगडमध्ये महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाली आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ बुधवारी (ता.15) जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी फोडला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. त्या बाबत आदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ग्रामपंचायत, नगरपंचायत व पोटनिवडणुकीत स्थानिक परिस्थिती नुसार राजकीय समीकरणे व निवडणुकीची रणनीती ठरविली जाते.

<div class="paragraphs"><p>Aditi Tatkare</p></div>
भाजपला मोठा धक्का...माजी आमदार संजय पवार समर्थकांसह राष्ट्रवादीत!

महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या सेवेसाठी अविरत काम करणारे भक्कम सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे मित्रपक्ष आहेत ते जनतेच्या सेवेत विकासाच्या मुद्द्यावर काम करीत आहेत. स्थानिक परिस्थिती नुसार समीकरणे वेगळी होतात, असे तटकरे म्हणाल्या. पाली नगरपंचायत निवडणुकीत सर्वांगीण विकासकामांना प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे जनतेने शेकाप व राष्ट्रवादी आघाडीला सत्तेत संधी द्यावी, असे आवाहन तटकरे यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Aditi Tatkare</p></div>
वर्ष उलटलं..बारा आमदारांची नियुक्ती नाही, हे लोकशाहीत बसतं का?

पालीतील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा, शुद्ध पाणीपुरवठा योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, भाविक व भक्तांना चांगल्या सोयीसुविधा आदी लोकाभिमुख विकास कामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. असे देखील तटकरे म्हणाल्या. या वेळी शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, नगरपंचायत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com