Nitesh Rane Vs Parshuram Uparkar : खंडणीचे आरोप, 'कुंडल्या' बाहेर काढण्याचा इशारा; राणे आणि उपरकर यांच्यात जुंपली

BJP Nitesh Rane and former MLA Parshuram Uparkar round of allegations : भाजप आमदार नीतेश राणे आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला असून, एकमेकांवर खंडणीचे आरोप करत आहेत.
Nitesh Rane Vs Parshuram Uparkar
Nitesh Rane Vs Parshuram Uparkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप आमदार नीतेश राणे आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यात जुंपली आहे. दोघेही एकमेकांच्या खंडणीच्या गोष्टी बाहेर काढत आहे. आमदार राणेंनी माजी आमदार उपरकर यांचं आयुष्य ब्लॅकमेलिंगमध्ये गेलं आहे, असं सांगत आहे, तर उपरकर यांनी राणेंविरुद्ध मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची आठवण करून दिली.

तसंच खासदार नारायण राणे यांच्या 'कुंडल्या' माझ्याकडं असल्याचा इशारा दिला आहे. राणे आणि उपरकर यांच्यातील हा संघर्ष आगामी काळात टोकापर्यंत जाणार असं सांगितलं जात आहे.

भाजप आमदार नीतेश राणेंनी काही दिवसापूर्वी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. उपरकर यांनी ब्लॅकमेलिंगमध्ये 'पीएच.डी.' केलीय. त्यातून त्यांना कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारत नाही. भाजप (BJP) नेत्यांवर बेछूट खोटे आरोप खपवून घेणार नाही. अशा खोट्या आरोपांचा सिंधुदुर्गाची जनता नक्कीच विचार करेल, असे म्हणत स्वतःचा हिशोब चुकता करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेत घाणेरडे राजकारण करत असतील, तर त्यांचाही हिशोब आमच्याकडं आहे, असा इशारा नीतेश राणेंनी परशुराम उपरकर यांना दिला होता.

Nitesh Rane Vs Parshuram Uparkar
Bhaskar Jadhav : माझ्या वाट्याला अनेक अडचणी...सध्या भीतीही वाटू लागलीय : भास्कर जाधव असं का म्हणाले?

मंत्री रवींद्र चव्हाण,अनिकेत पटवर्धन यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करताना कोणतेही घाणेरडे राजकारण खपवून घेणार नाही. जिल्ह्याच्या विकासात एक टक्का योगदान नसलेल्या उपरकरांनी यापुढे मंत्री रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन आणि त्यांच्या सहकाऱ्यावर विनाकारण टीका केल्यास उपरकरांची अंडी-पिल्ली बाहेर काढू, असा खणखणीत इशारा नीतेश राणे यांनी दिला. राजकारणात यांची किंमत शून्य असून, उपरकरांना मनसेतून (MNS) हाकलून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पायावर गेले, तरी त्यांनी घेतलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनीही उपरकरांना पक्षप्रवेश दिला नसल्याचा सणसणीत टोला नीतेश राणेंनी लगावला.

Nitesh Rane Vs Parshuram Uparkar
Narayan Rane : 'मशिदीत घुसून मारू…'; नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर नारायण राणेंच स्पष्टीकरण म्हणाले, "मशिद हा शब्द…"

नीतेश राणे यांनी डिवचल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देखील नीतेश राणे आणि त्यांच्या वडील खासदार नारायण राणे यांच्यावर हल्ला चढवला. भाजप आमदार नीतेश राणे हेच खंडणीखोर आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल आहे.

तसेच माझ्या कुंडल्या काढण्याच्या भानगडीत नीतेश राणेंनी पडू नये. कारण नीतेश राणे आणि त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांच्या अनेक कुंडल्या माझ्याकडे आहेत. माझ्या कुंडल्या काढण्याचा प्रयत्न नीतेश राणे यांनी केला तर, मी तुम्हाला साफ उघडा पाडेन, असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com