Shivrajyabhishek Sohala 2023: रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kokan News: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळा पार पडला.
Shivrajyabhishek Sohala 2023:
Shivrajyabhishek Sohala 2023: Sarkarnama

Shivaji Maharaj Rajyabhishek 2023 : ''किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येईल, ही शिवसृष्टी उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची निधी दिला जाईल, तसेच, शिवसृष्टीसाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही.'' अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohla 2023) पार पडला. शिवराज्याभिषेकानिमित्ताने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी, रायगडाच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले. तर गोगावले यांची ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीची घोषणा केली.

Shivrajyabhishek Sohala 2023:
Maharashtra SSC Result : दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी,कोकण ठरलं अव्वल तर...

याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, प्रतापगड प्राधिकरणाचीही घोषणा करत उदयनराजे भोसले यांची प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. उदयनराजे भोसले यांनी प्रतापगड प्राधिकरणाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मान देत मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. (Maharashtra Politics)

Shivrajyabhishek Sohala 2023:
Ashok Gehlot Announce Free Electricity : 'मोफत वीज' ठरली सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’ ; दिल्ली, पंजाबनंतर आता 'या' राज्यातही..

''आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आज या ऐतिहासिक सोहळ्याला ३५० वर्षे झाली. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

Shivrajyabhishek Sohala 2023:
Shivrajyabhishek Sohala 2023 : मोदींनी शिवराज्यभिषेक दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा ; "राष्ट्रनिर्माण करण्यासाठी..

तर आजच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने राज्यातील सहा महसुली क्षेत्रात ५० कोटी रुपयांचा निधी देऊन शिवरायांच्या जीवनावर आधारित उद्याने उभारणार, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच राजधानी दिल्लीत शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी आम्ही पंतप्रधानांकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com