Sindhudurg : "उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सतत राज्यात दंगली होणार हे सांगत होते, मग हीच ती दंगल होती का ? असा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. जालन्यातील घटनेसंदर्भात राणेंनी टि्वट करीत शिवसेनेचे (ठाकरे गट)पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
"काल (शुक्रवारी) रात्री छत्रपती संभाजीनगरला ठाकरे गटाच्या कुठल्या नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या ? याची चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात निघणारे हिंदू मोर्चे हे काँग्रेस आणि विरोधकांचे खरे दुखणे आहे. लव जिहाद, लँड जिहाद सारखे मुद्दे यांना अडचणीचे आहेत. कारण हे ज्या जिहादी लोकांना पोसतात तेच अडचणीच यायला लागले आहेत. हिंदू समाज जागा होतो आहे आणि ते यांना परवडणारे नाही.हिंदू समाजाला जाती-जातीमध्ये झुंजवत ठेवायचे हाच त्यांचा खरा कार्यक्रम आहे,' असे राणेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला एवढे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? असा सवाल राज यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारला आहे.
सत्तेच्या मस्तीतून हा लाठीचार्ज करणाऱ्या मस्तवाल आणि घमेंडिया सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, असा हल्लोबोल शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी कालच लाठीमार झालेल्या अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेटी दिल्या. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.स्थानिक नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.