Chhatrapati Shivaji Maharaj Statue : 'पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट ' ; भाजपचा गंभीर आरोप!

State Vice President of BJP Atul Kalsekar : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी यामागचे कारणही सांगितले आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj StatueSarkarnama
Published on
Updated on

BJP on Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणही तापलं आहे. तर या घटनेमागे राजकीय कट असल्याचा आरोप भाजपने विरोधकांवर केला आहे.

भाजपचे(BJP) प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे की, 'मला असं वाटतं की हा जो पुतळा नौदल दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते त्यांचं लोकर्पण झालेलं होतं. त्याचं कौतुक महाराष्ट्रभर आणि देशभर खूप झालं. सर्जेकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला या निमित्त देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आला. खरं म्हणजे हा पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट आहे, असं आमचं म्हणणं आहे.'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
BJP Vs Shivsena : कोकणात सेना-भाजप वाद पेटला; मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरीतील कार्यक्रमाकडे फडणवीस, चव्हाणांसह भाजप नेत्यांची पाठ

तसेच याचं कारण म्हणजे, लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार हे लोकांमध्ये खूप गाजलं आहे. आताच्या सगळ्या घटना जर बघितल्या, जसं की बदलापूरची घटना ही घटना निषेधार्ह आहेच, पण त्यानिमित्त झालेल्या आंदोलनाची दिशा जर बघितली हाही निवडणुकीच्या घातपाताचा एक मोठा भाग आहे. निवडणुकीच्या राजकारणात मुद्दाम सरकारला बदनाम करण्यासाठी, ही घटना घडू शकते असं माझं मत आहे.' असा आरोपही काळसेकरांनी केला आहे.

याशिवाय 'माझी मागणी आहे की, केवळ सीसीटीव्ही फुटेज नको. सॅटेलाइट फुटेजने या सगळ्या घटनेची चौकशी होण्याची गरज आहे. जिल्हा आणि राज्याच्या पोलिस यंत्रणेने या सगळ्या घटनेची फार बारकाईन चौकशी करण्याची गरज आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या पर्यटन नकाशावर मालवण किल्ला आणि राजकोट किल्ला आणण्याचं काम जे या सरकारने केलं होतं, त्याला कुठंतरी बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रसंग विरोधकांना केला असावा, असा माझा दावा आहे.' असंही काळसेकरांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Video Vaibhav Naik : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी PWD चं कार्यालय फोडलं, गंभीर कारण आलं समोर

याचबरोबर 'याची चौकशी करावी, राज्याच्या गृहखात्याने करावी, केंद्राने करावी. कारण हा पुतळा नौदलाने उभारला होता. पुतळा उभारताना नौदलाने सगळ्या बाबींचा विचार केला असणार, अभ्यास केला असणार. त्यामुळे ही घटना थोडी संशयास्पद वाटते. या सगळ्या घटनाक्रमात भाजप आणि महायुतीला घेरण्याचा तर डाव नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणून या सगळ्या विषयाची चौकशी करावी अशी मी मागणी सरकारकडे करतो.' असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष काळसेकरांनी सांगितलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com