Dnyaneshwar Matre, Balaram Patil News
Dnyaneshwar Matre, Balaram Patil NewsSarkarnama

Konkan Teacher Constituency Election : भाजपने कोकणात केला आघाडीचा करेक्ट कार्यक्रम; म्हात्रेंच्या विजयाची पाच कारणे

Graduate Constituency Election Result: विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत.

Legislative Council Election News : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजप (BJP) चे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले होते. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dnyaneshwar Matre, Balaram Patil News
Kokan Teacher Election Result : Breaking : कोकणात भाजपचा विजय; महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का

या वेळी कोकण शिक्षक मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला होता. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचे सांगितले जात आहे. म्हात्रे यांनी मोठ्या फरकाने पाटील यांचा पराभव केला आहे.

गेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ६ हजारांहून अधिक मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भाजपने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली होती. मागील निवडणुकीतही म्हात्रे यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. त्याचा त्यांना यावेळी मोठा फायदा झाला.

ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. यासह अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये त्यांची संबंध चांगले आहेत.

शिवसेनाप्रणित (Shivsena) शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले होते. तब्बल सहा वर्षे म्हात्रे यांनी शिक्षक सेना आणि राज्य मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून कोकण विभाग पिंजून काढला होता. या काळात शिक्षक मतदारांची नोंदणीही म्हात्रे यांनी मोठ्या प्रमाणात करून घेतली होती. मधल्या काळात इतर उमेदवारांपेक्षा म्हात्रे यांनी आपल्या प्रचारात सातत्य ठेवले होते.

Dnyaneshwar Matre, Balaram Patil News
Nagpur : सुरुवातीला विमाशिचे सुधाकर अडबाले आघाडीवर, गाणारांना रोखणार?

त्यात भाजपची ही फळी त्यांना या निवडणुकीत मिळाली. नियोजनबद्ध कार्यक्रम मतदार नोंदणी यामुळे म्हात्रेंचे पारडे जड होते. मागील निवडणुकीत कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्या निवडणुकीत पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती.

तसेच तत्कालिन आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू या दोन उमेदवारांमुळे ठाणे जिल्ह्यातील मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फुट पडली होती. त्याचा थेट फायदा बाळाराम पाटील यांना झाला होता. मात्र, यावेळी भाजपने ठाण्यामध्ये मतांमध्ये फूट होणार नाही, याची काळजी घेतील होती. दुसरीकडे आघाडीमध्ये तेवढा समन्वय नसल्याचे दिसून आले होते. यामुळे म्हात्रे यांनी मोठा विजय मिळवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com