'अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली'

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश आजच पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात येणार आहेत.
Anil Parab's Resort
Anil Parab's ResortSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बुधवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे रत्नागिरीच्या दापोलीमधील रिसॉर्ट (Resort) पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. (Chief Minister signs order to demolish Anil Parab's resort : Kirit Somaiya)

सोमय्या पुढे म्हणाले की, माजी मंत्री परब यांच्या रिसॉर्टची फायल आता पर्यावरण मंत्रालयाकडे आलेली आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश आजच पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात येणार आहेत. पुढच्या आठवड्यात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हे रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार की जिल्हाधिकारी कार्यालय टेंडर काढून ते पाडणार, याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

Anil Parab's Resort
सुशीलकुमार शिंदे राजकारणापासून अलिप्त झाले अन्‌ सोलापूर काँग्रेसला घरघर लागली!

मुख्यमंत्र्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्यावर कार्यवाही होणार आहे. मी शनिवारी दापोलीत जाणार आहे. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासात जमा होईल. तसेच, परब यांचा रिसॉर्ट पडणार आहेच. पण, रिसॉर्टसाठी पैसे कोठून आले, याचा तपासही आता वेगात होणार आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला.

Anil Parab's Resort
राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

कोविड गैरव्यवहार प्रकरणातील सुनावणीत ३२ कोटी ५३ लाख रुपये सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यात वरळी कोविड सेंटरचे ४ कोटी ५७ लाख रुपये होते, त्याबाबतचे पुरावे आज आम्ही वकिलाच्या माध्यमातून दिले आहेत. आज पोलिस नसल्यामुळे सुनावणी ३० ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवलेली आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे, असे पोलिस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. हा अजामीनपात्र गुन्ह असल्याने सुजीत पाटकर यांना दोन ते चार दिवसांत अटक होईल, अशी शक्यता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

Anil Parab's Resort
राष्ट्रवादीला धक्का देणारे अभिजित पाटलांच्या कारखाना, घर, ऑफिसवर इन्कम टॅक्सचे छापे

कोविड गैरव्यवहार प्रकरणातील ईडी आणि इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनीही लक्ष घालावे, यासाठी मी संबंधितांशी चर्चा केली आहे, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com