Chiplun Clashes : राड्यानंतर ठाकरे गटाच्या तिघांना अटक; 350 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

Clash Between Bjp and Thackeray Group Shiv Sena Supporters Chiplun : राजकीय राड्यानंतर चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई...
Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Nilesh Rane, Bhaskar Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Chiplun Ratnagiri News :

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच कोकणात चिपळूण येथे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार Bhaskar Jadhav आणि भाजप नेते निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दगडफेक झाली. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला होता. आता या सगळ्यानंतर दुसऱ्या दिवशी चिपळूण पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav News : अटक झाली तरी चालेल, मी घाबरणार नाही; जाधव राणेंवर बरसले

पोलिसांनी जवळपास साडेतीनशे ते चारशे जणांवर गुन्हे दाखल केला आहे. यापैकी ठाकरे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांना चिपळूण पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयबाहेर व घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशांत वामन चव्हाण पोलीस हवालदार यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. चिपळूण येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक अटक करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपच्या दोन प्राधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिपळूण भाजपचे तालुका प्रमुख वसंत ताम्हणकर व शहर प्रमुख परिमल भोसले या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 350 ते 400 जणांच्या जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ते 12 कलमे पोलिसांनी लावली आहेत Ipc 143, 145, 147,149,160,337,353,504,506 या कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकारी कामात अडथळा, दोन गटात हाणामारी, शिवीगाळ आणि शारीरिक दुखापत या संदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालच्या घटनेनंतर या सगळ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती चिपळूण पोलिसांनी दिली आहे.

Nilesh Rane, Bhaskar Jadhav
Chiplun Rane-Jadhav Clash : चिपळूण राडा राणे-जाधवांच्या अंगलट येणार? हायकोर्ट वकिलांची पोलिसांत धाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com