Bhaskar Jadhav News : अटक झाली तरी चालेल, मी घाबरणार नाही; जाधव राणेंवर बरसले

Bhaskar Jadhav on Nilesh Rane After Chiplun Clash : भास्कर जाधव यांचे नीलेश राणेंवर गंभीर आरोप...
Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Bhaskar Jadhav, Nilesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Jadhav Ratnagiri News :

कोकणात चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप नेते नीलेश राणे यांच्यात राडा झाला. यानंतर आता आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत राणेंवर हल्लाबोल केला आहे. नीलेश राणे काय बोलले ते शंभर वेळा दाखवा. मला बघायचंय की भाजपची हीच संस्कृती आणि हेच संस्कार आहेत का? असा सवाल जाधव यांनी केला आहे.

भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरून तेही अशी भाषा वापरू शकतात. यापुढे भाजपच्या एकाही उमेदवाराला महाराष्ट्रात महिला मत देणार नाहीत. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहणार आहे. मला अटक केली तरीही चिंता नाही, पण मी घाबरणार नाही, असे जाधव म्हणाले.

Nilesh Rane यांनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की, उद्या भास्कर जाधव याला मी संपवणार. आणि त्यांनी ही भाजपची नवीन संस्कृती काल दाखवून दिली आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, अशी उपरोधिक टीका जाधव यांनी केली. पोलिसांनीही नीलेश राणे यांना चुकीच्या पद्धतीने संरक्षण दिल्याचा आरोप जाधव यांनी या वेळी केला.

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Chiplun Rane Vs Jadhav : मोठी बातमी ! चिपळूणमधील राजकीय राड्यानंतर 300 ते 400 जणांवर गुन्हा

चिपळूणमध्ये जवळजवळ तीन दिवस अगोदर वेगवेगळ्या पाच-पन्नास बसेस या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या. काल त्या सगळ्या तुम्ही पाहिल्या नाहीत का? जी काही माणसे त्यांच्याबरोबर होती आणि बाहेरच्या गाड्या चिपळूणमध्ये आमच्या कार्यालयासमोर सारख्या घेऊन का येत होते? मला असं वाटतं त्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी पोलिसांवर केला.

मला हा वाद संपवायचाय. यापूर्वी मी मुलाखत दिलेली आहे. माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. राणे माझ्यासाठी बेदखल आहेत, असं मी यापूर्वी सांगितलं आहे. पण त्यांना तो वाद संपवायचाच नाही. त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यांना मला ठार मारून आवाज संपवायचा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी सगळे फुटेज चेक करावेत. सगळा घटनाक्रम बघावा. आम्ही पोलिसांना पूर्वी असं काहीतरी घडणार आहे, हे पत्रातून दिलेलं आहे. याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती. पोस्टर लावले. तुमचे झेंडे लावले. आमच्या चिपळूणच्या प्रथेप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही तुमच्या एकाही पोस्टरला हात लावला का? तुमच्या एकाही झेंड्याला हात लावला का? नाही लावला, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते काल मुंबईवरून आले. मी जे काल सांगत होतो तेच थोडक्यात सांगतो. वास्तविक त्यांना परस्पर गुहागरला जाण्याकरता दोन मार्ग आहेत. एक दापोलीतून आणि दुसरा चिपळूण पेढे परशुरामवरून डायरेक्ट गुहागरला जाण्याचा मार्ग आहे. माझ्या ऑफिसच्या बाजूला रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्यांच्या गाड्या गेल्या. दगड मारले ते आजही दिसत आहे. या ठिकाणी फार मोठी दंगल घडावी, अशा पद्धतीने वातावरण निर्मिती त्यांनी केली होती, असा आरोप त्यांनी केला.

माझ्या मनामध्ये वेदना होत्या. पूर्वी त्यांनी केलेली भाषणं बघा. चिपळूणमध्ये जे काल घडले त्यामध्ये त्यांनी जी भाषा वापरली होती ते बघा. त्याच्या अगोदर नारायणराव राणे यांनी नीलेश राणे यांनी काय भाषा वापरली ती बघा. सगळे खोटं बोलण्याचं काम आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे, की ते काल माझ्या कुटुंबावर बोलले. या भाषेमध्ये अर्धा टक्का तरी मी बोललो होतो काय ? ते ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले, हे सातत्याने बोलताहेत. भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे यांनी केलेले स्टेटमेंट बघितलं आणि म्हणून ही भाजपची नवीन संस्कृती आम्हाला अनुभवायला येत आहे, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

R

Bhaskar Jadhav, Nilesh Rane
Vaibhav Naik : चिपळूणच्या राड्यानंतर कणकवलीतील आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ; नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com