Pramod Sawant : कला-संस्कृती मंत्र्यामुळे सरकारची कोंडी, CM सावंतांनी प्रेस कॉन्फरन्सच गुंडाळली

Goa News Pramod Sawant And Minister Govind Gawde : राज्यभरातील कलाकारांनी पणजी येथे जाहीर सभा घेऊन पंधरा दिवसांत कला अकादमी पूर्णपणे खुली करा अन्यथा पाय उतार व्हा, असा इशारा मंत्री गोविंद गावडे यांना दिला आहे.
CM Pramod Sawant, Govind Gawde
CM Pramod Sawant, Govind GawdeSarkarnama

Goa News, 19 June : कला अकादमी नूतनीकरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, या राज्यभरातील कलाकारांच्या मागणीवर बोलण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawat) यांनी नकार दिला. पुन्हा कधीतरी या विषयावर बोलू, असं म्हणत त्यांनी पत्रकार परिषदच गुंडाळली.

पर्वरी येथे मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी यावर पुन्हा कधीतरी बोलू, असं म्हणर उत्तर देणं टाळलं. हाच प्रश्न पुन्हा विचारताच त्यांनी पत्रकार परिषदच गुंडाळली.

राज्यभरातील कलाकारांनी पणजी (Panaji) येथे जाहीर सभा घेऊन पंधरा दिवसांत कला अकादमी पूर्णपणे खुली करा अन्यथा पाय उतार व्हा, असा इशारा मंत्री गोविंद गावडे यांना दिला आहे. विशेष म्हणजे त्या सभेला गावडे देखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी या विषयावर जाहीर भाष्य करणं टाळलं आहे. त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

CM Pramod Sawant, Govind Gawde
Ramdas Athawale : ठरलंय दादांच्या राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रिपद, केंद्रात ३ टर्म मंत्री असलेल्या बड्या नेत्याचा दावा

या विषयावरून सरकार चांगलंच कोंडीत सापडलं आहे. सर्व बाजूंनी नेटकरी सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे या सर्व घटनांची नोंद आता भाजपने प्रदेश पातळीवर घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी जरूर बोलू, असं जाहीरपणे सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात अनपेक्षित अशा पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर भाजप (BJP) पक्ष संघटनेत आता मंत्रिमंडळ फेरबदल केला पाहिजे, असा विचार बळावला आहे. खासगीत अनेक नेते मंत्रिमंडळ बदल व्हायला हवा, असे मत व्यक्त करू लागले आहेत.

काही आमदारांचे समर्थकही आपल्या आमदाराला मंत्री करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊ लागले आहेत. सावर्डेचे आमदार आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या समर्थक पंच, सरपंचांनी मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे भेट घेतली आहे.

CM Pramod Sawant, Govind Gawde
BJP : 'महाराष्ट्रात कुणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, तर...' दिल्लीतील नाराज वरिष्ठांचा रोख नेमका कुणाकडे?

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या हालचाली प्रदेश पातळीवर सुरू असतानाच मंत्री गोविंद गावडे यांच्या विषयीचा कलाकारांचा रोष उफाळून आला आहे. सध्या विविध समाज माध्यमांवर कला अकादमी प्रकरणावरून गोविंद गावडे आणि सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com