मुख्यमंत्र्यांनी `नारायण राणें`चा फोन लगेच घेतला..केव्हाही संपर्क करा, असेही सांगितले!

सावंतवाडीच्या या नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : शिवसेना (Shivsena) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे संबंध म्हटले की समोर येता तो संघर्ष. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोघांत संभाषण होऊन किती दिवस झाले, हे एकमेकांच्या टिकेतूनच कळते. राणेंनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला होता तर सुशांतसिंगच्या मृत्यूप्रकरणाच्या वेळी मातोश्रीवरून राणेंना फोन गेला होता, असे राणेंनी सांगितले होते. त्यामुळे या दोघांत या व्यतिरिक्त संभाषण झाल्याचा पुरावा नाही. पण कधीकधी नामसाधर्म्यामुळे गमती-जमतीही घडतात. ती रत्नागिरीत घडली. उद्धव ठाकरे हे फोन घेत नाहीत, अशी त्यांच्याबद्दलची जुनी तक्रार आहे. प्रत्यक्षात राणेंना वेगळाच अनुभव आला.

रत्नागिरीच्या गुरूवारी दुपारच्या वेळेत येथील शासकीय विश्रामगृहात नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर या राणेंनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क केला. तेव्हा ठाकरे म्हणाले, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिले.

आता तुम्हाला हे नारायण राणे म्हणजे केंद्रीय मंत्री वाटले असतील. पण हे राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे माजी पंचायत समिती सदस्य आहेत.
उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राणे यांनी आज निधीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात सामंत यांची भेट घेतली. या वेळी सामंत गमतीने म्हणाले, नारायण राणे भेटीस आले आहेत. नारायण राणे यांनी उदय सामंत यांची रत्नागिरीत भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ``त्या नारायण राणे यांचा मी फोन घेत नाही. तुम्ही फोन केल्यावर सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असे सांगा. मी फोन घेईन. पुढे हे राणे म्हणाले, मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. या वेळी त्यांनी ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधनदेखील अभिमानाने दाखवले. सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.``

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com