Konkan News : माघारीची विनंती धुडकावून लावत मुलीने थोपटले आईच्या विरोधात दंड

प्रचार करताना मी कुठेही आईच्या विरोधात काहीही बोलत नाही.
Prajakta Devkar
Prajakta DevkarSarkarnama
Published on
Updated on

गुहागर (जि. रत्नागिरी) : राजकारणात एकाच घरात दोन, तीन पक्षांचे पदाधिकारी पाहायला मिळणे हे आता नवीन राहिलेले नाही. एखाद्या निवडणुकीत (Election) एकाच घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात हे ही नवे नाही. परंतु एकाच ग्रामपंचायतीत (Gram panchyat), एकाच प्रभागात, एकाच प्रवर्गातून एकमेकांच्या विरोधात आई आणि मुलगी उभी आहेत. त्यामुळे या गावात सध्या सरपंच कोण याबरोबरच आई की, मुलगी? जिंकणार कोण? अशीही चर्चा सुरू आहे. (Daughter challenge to Mother in Gram panchayat elections in Guhagar)

गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या गटात आई आणि मुलगी या दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुवर्णा दिनानाथ भोसले आणि त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर (सासरचे नाव) अशी या उमेदवारांची नावे आहेत. गावातील दोन वेगवेगळ्या आघाड्यांमधून या मायलेकी एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत.

Prajakta Devkar
Pune News : पुण्यात शासकीय कार्यक्रम घ्यायचाय...?; मग पालकमंत्र्यांची परवानगी हवीच!

याबाबत बोलताना ७० वर्षीय सुवर्णा भोसले म्हणाल्या, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मंदिरात झालेल्या बैठकीत काही तरुण मुलांनी मला उभे राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरुन आले. त्यावेळी या प्रभागातून अन्य कोणीच अर्ज भरला नव्हता. नंतर माझ्या लेकीने अर्ज भरला. ती यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होती. म्हणून तिला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. काही नातेवाईकांनीही विनंती केली. मात्र ती निवडणूक लढविण्यावर ठाम राहिली. आता निवडणूक असल्याने मी देखील प्रचारात उतरले आहे.

Prajakta Devkar
BJP News : भाजपच्या बड्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा दुरावा

सुवर्णा भोसले यांची लेक प्राजक्ता देवकर म्हणाल्या की, प्रचार करताना मी कुठेही आईच्या विरोधात काहीही बोलत नाही. सात वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार जवळून पाहिला आहे. या अनुभवाच्या बळावर गाव पॅनेलने मला उमेदवारी दिली आहे. निवडून येण्यासाठी सर्वांचे सहकार्य, मतरुपी आशीर्वाद हवे आहेत. असा प्रचार मी करत आहे. या प्रवर्गात केवळ याच दोघी उमेदवार असल्याने दोघींपैकी एक जिंकणार हे निश्चित आहे. दोघींपैकी कोण जिंकणार. अनुभवी मुलगी आईवर मात करणार की मातेच्या पदरात विजयाचे माप जनता टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com