सकाळी राणेंसोबत बैठक अन् दुपारी अजितदादा स्टेजवरूनच म्हणाले , महाभाग!

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.
Narayan Rane, Ajit Pawar

Narayan Rane, Ajit Pawar

Sarkarnama 

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sindhudurg District Central Bank) निवडणुकीचा (Election) प्रचार आता शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) विरूध्द भाजप (BJP) असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) या मंत्र्यांनी प्रचारात हजेरी लावत रंगत वाढवली. यावेळी पवारांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेपूर्वी अजित पवार यांनी सकाळी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत नारायण राणे यांच्यासह खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), सामंत, सतेज पाटील, आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar), आमदार नितेश राणे (Nitesh Rane), आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पवारांनी प्रचार सभेत राणे यांचे नाव न घेता टीका केली.

तुमच्या जिल्ह्यातील काही महाभागाने जिल्हा बँकेचे कर्ज कसं घेतले आणि कसं थकवलंय हे ही आपण पहा, असं म्हणत पवारांनी राणे यांचे नाव न घेता टोला लगावला. राणे यांनी कर्ज थकवल्याबाबत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत टीका केली होती. 2014 मध्ये बोलेरो गाड्यांसाठी घेतलेल्या कर्जाची आणि त्याच्या परतफेडीची आठवण सावंत यांनी यावेळी करुन दिली होती.

सावंत म्हणाले होते की, ज्याप्रमाणे राणे कुटुंबीयांनी आणि भाजपाने जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्याप्रमाणेच 2014 ला प्रचारासाठी घेतलेल्या आणि थकीत असलेल्या बोलेरो गाड्यांचे कर्ज भरण्यासाठीही प्रतिष्ठा पणाला लावावी आणि अण्णा केसरकरांसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रु काढण्याचे काम करावे, असे सावंत म्हणाले होते.

2014 ला आचारसंहितेच्या कालावधीत प्रचारासाठी तेरा बोलोरो गाड्या आणल्या होत्या. यावर तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी आक्षेप घेत त्याविरुद्ध पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. त्यावेळी राजन तेली बँकेचे चेअरमन होते. चौकशीचा त्रास होऊ नये यासाठी माझ्यासह एकूण 13 जणांच्या नावावर राणेंनी जिल्हा बँकेमध्ये कर्ज प्रकरण केले; जे कि अद्याप फेडलेले नाही. नाबार्डच्या नियमाप्रमाणे संचालकांना कर्ज थकित असल्यास एक दिवसही पदावर राहता येत नाही. त्यामुळे माझ्यासह प्रकाश मोर्य, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील या चौघांनी त्या कर्जाती परतफेड केली; मात्र उर्वरित नऊ जणांच्या नावावर अद्यापही थकीत कर्ज आहे, असे सावंत यांनी सांगितले होते.

बऱ्याच वेळा यासाठीची वसुली प्रक्रियाही पार पडली. वन टाइम सेटलमेंटमध्ये काहींनी थोडेफार पैसे भरले; परंतु येथील ज्येष्ठ शिवसैनिक असलेल्या अण्णा केसरकर यांच्या नावावर आजही १८ लाख रुपये थकीत आहेत. आजही त्या गाड्या राणे कुटुंबियांच्या ताब्यात आहेत, असेही सावंत यांनी सांगितले. तसेच जिल्हा बँक सुरक्षित राहण्यासाठी आम्ही राणेंची साथ सोडली, अशी कबुलीही सावंत यांनी यावेळी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com