Ratnagiri News : मतदारजागृतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची बाजी; जिल्हाधिकाऱ्यांना...

M Devender Singh : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जीवन देसाई यांची उत्कृष्ट मतदारजागृती पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली होती.
 ratnagiri Collector award
ratnagiri Collector awardsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : निवडणूक विभागात उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग उपक्रम राबवून मतदारयादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट काम झाले. या कामाची दखल घेत कोकण विभागातून रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा मुंबईला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 ratnagiri Collector award
Shivsena Nashik Convention : उद्धव ठाकरेंची नाशकातील डरकाळी; शिवसैनिकांसाठी ठरणार बूस्टर!

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासोबतच उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जीवन देसाई यांची उत्कृष्ट मतदारजागृती पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली होती, तसेच उत्कृष्ट मतदारनोंदणी अधिकारी 2024 करिता कोकण विभागातून चिपळून विभागातून उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांची निवड करण्यात आली होती.

'उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार 2024' यामध्ये समाजमाध्यमांद्वारे उत्कृष्ट प्रचार प्रसिद्धीकरिता राज्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्यासाठी समाजमाध्यम समन्वयक वैभव विजय आंबेरकर यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून गेल्या वर्षभरात राज्यभर जनजागृती केली जात आहे. नवमतदारनोंदणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. मतदारनोंदणीची, मतदारयाद्या दुरुस्तीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात मतदारनोंदणीचे काम उत्तम प्रकारे झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी, कर्मचारी, संस्था व संघटनांच्या पुरस्कारांची घोषणा केली होती.

(Edited By Roshan More)

R...

 ratnagiri Collector award
Maratha Survey Started : ॲपमध्ये केवळ 'महार' जातीचा रकाना; बौद्धांचा खुल्या प्रवर्गात समावेश, वंचितची 'ही' भूमिका !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com