गुहागरच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सुनील तटकरेंची इच्छा पूर्ण झाली!

राजेश बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी
Rajesh Bendal
Rajesh Bendal Sarkarnama

गुहागर (जि. रत्नागिरी) : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. राजेश बेंडल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये पक्ष मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याचा निश्चितपणे फायदा होईल. आता त्यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते राजेश बेंडल यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. (Guhagar Mayor Rajesh Bendal joins NCP)

गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविकात खासदार सुनील तटकरे म्हणाले, गुहागर नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत शहर विकास आघाडीने मोठा बदल घडवला. राजेश बेंडल यांची गुहागर परिसरात मोठी ताकद आहे. म्हणूनच त्याने राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी मी आग्रही होतो.

Rajesh Bendal
जवळीक वाढलेल्या हर्षवर्धन पाटलांना अमित शहा कोणते गिफ्ट देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खासदार म्हणून निवडून आल्यावर दिल्लीपासून तालुकास्तरावर सुनील तटकरे काम करत आहेत. विषेशतः कोकणातील कुणबी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी, या समाजाला पुढे नेण्यासाठी विचारपूर्वक पावले उचलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळकट करण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. अशावेळी राजेश बेंडल यांच्यासारखे तरुण, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, कुणबी समाजाचे नेतृत्व करणारा नेता, कार्यकर्ता राष्ट्रवादीत येतोय. मी त्यांचे स्वागत करतो. येणाऱ्या काळात चिपळूण, खेड, दापोलीतील अनेक मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे कोकणात राष्ट्रवादी निश्चित मजबूत होणार आहे.

Rajesh Bendal
हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या मदतीची परतफेड करणार का?

आज राजेश बेंडल यांच्याबरोबर पिंपर, जामसूद, वेळंब-घाडेवाडी, चिंद्रावळे, दोडवली, तवसाळ, पडवे येथील शिवसेना, भाजप व काँग्रेस पक्षातील 20 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र आंब्रे, तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, नवनियुक्त तालुका महिला अध्यक्ष व नगरसेविका स्नेहा भागडे, नगरसेविका सुजाता बागकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मंदार कचरेकर, विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव, माजी तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे, तुषार सुर्वे, जगदीश गडदे, जिल्हा सचिव विजय मोहिते, दीपक शिरधनकर, रवींद्र बागकर, आसिफ साल्हे, वैभव आदवडे, संतोष मोरे, प्रसाद विचारे, संतोष सोलकर, अनंत मालप, कृष्णा वणे, महादेव साटले आदी उपस्थित होते.

Rajesh Bendal
वाळू व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून; प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार

म्हणून शहर विकास आघाडीच्या इतर नगरसेवकांचा प्रवेश टाळला

गुहागर नगरपंचायतीमधील शहर विकास आघाडीचे नगरसेवक माधव साटले, अमोल गोयथळे, स्नेहल रेवाळे, प्रणिता साटले, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रसाद बोले हे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला नाही. तांत्रिक कारणांमुळे आज हे नगरसेवक पक्षप्रवेश करू शकत नाहीत, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com