Konkan Political News: 'कितीही आमिषे आली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही...'

Vaibhav Naik Determination: जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ न देणे, माझे कर्तव्य आहे.
Vaibhav Naik
Vaibhav NaikSarkarnama

Kudal News : आज मी जो काही आहे, तो केवळ शिवसेना पक्षाने संधी दिल्यामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच. ही जाणीव मी कधीही विसरणार नाही. त्यामुळे कितीही आमिषे आली तरीही मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. (I won't leave Uddhav Thackeray no matter how many lures: Vaibhav Naik)

गावभेट दौऱ्यादरम्यान आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघातील पिंगुळी-शेटकरवाडी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी पिंगुळी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. विकास कामांचा आढावा घेतला. संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोणतीही अपेक्षा न बाळगता कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला दोनवेळा विधानसभेत निवडून दिले आहे. जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ न देणे, माझे कर्तव्य आहे.

Vaibhav Naik
Injustice to Sangram Thopte : आमदार संग्राम थोपटेंवर आमच्याकडून अन्याय झाल्यासारखं वाटतंय; काँग्रेस नेत्याची कबुली

आज मी जो काही आहे, तो केवळ शिवसेना पक्षाने संधी दिल्यामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच. ही जाणीव मी कधीही विसरणार नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे, असेही नाईक म्हणले.

Vaibhav Naik
Sharad Pawar Kolhapur Sabha : कोल्हापूरच्या सभेत शरद पवार ‘ते’ संशयाचे धुके दूर करणार का?; मुश्रीफांवरही बोलणे टाळण्याची शक्यता...

आमदार नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. कित्येक वर्षे प्रलंबित असलेली कामे आमदार नाईक यांनी मार्गी लावली आहेत. कुडाळ येथील महिला बाल रुग्णालय हे आमदार नाईक यांचे आदर्शवत काम आहे. इतर आमदारांनी गद्दारी केली असली तरी ते निष्ठावंत राहिले. त्यांच्यावर एसीबीची चौकशी लावण्यात आली. मात्र, तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, असेही स्थानिक पदाधिकारी पडते यांनी स्पष्ट केले.

Vaibhav Naik
Pawar Vs Shinde Group : मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांच्या निशाण्यावर दादा भुसे; ‘तसं बोलण्याची गरज नव्हती....’

या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपतालुका प्रमुख मिलींद परब, राजू गवंडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, पिंगुळी विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, माजी सरपंच निर्मला पालकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com