Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटला; नारायण राणे महायुतीचे उमेदवार, सामंतांची माघार

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024: अखेर महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून, भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024: अखेर महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून, भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांची समजूत काढण्यात युतीच्या नेत्यांना यश आल्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नारायण राणेंच्या (Narayan Rane) उमेदवारीचा उल्लेख आहे. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये (Vinayak Raut) थेट लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखेर सामंतांची माघार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. शिंदे गटाकडून 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच, भावी खासदार किरण सामंत' अशा स्वरूपाचे स्टेटस ठेवण्यात आले होते.

त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत (Kiran Samant) यांना फायनल झाली का? अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु आज उदय सामंत आणि किरण सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असून, युतीच्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं जाहीर केलं.

या वेळेला कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही

भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड व मावळ या तीनही लोकसभा जागांवर भाजपचे कमळ फुलेल, असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं होतं.

तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळवर अन्याय नको. देवेंद्रजींनी सांगितले आहे की, या वेळेस कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता. त्यानुसार अखेर राणेंना उमेदवारी देऊन भाजपने कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com