Nitesh Rane: राम मंदिर आमंत्रणावरून राजकारण केले नाही, असे म्हणणाऱ्या राऊतांना राणेंनी फटकारले!

Maharashtra Politics:आमंत्रणावरून कधीच आम्ही राजकारण केले नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केलं होतं.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन आमंत्रणावरून सध्या ठाकरे गट व भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक्य युद्ध रंगलं आहे. याच विषयावरून खासदार संजय राऊत यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

तुमचे मालक (उद्धव ठाकरे) जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिल्या होत्या. पण मुख्य कार्यक्रमासाठी फडणवीसांना डावलले होते. मेट्रोच्या कार्यक्रमातही फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना त्यांना का डावलले, असा सवाल करत अयोध्येच्या निमंत्रणावरून सुनावलं आहे.

अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांना आमंत्रण नाही. त्या ठिकाणी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे प्रभू श्रीरामच ठरवेल, असे सांगत उद्धव ठाकरे व संजय राऊत हे किती हिंदूद्वेष करतात हे यांच्या अनेक वक्तव्यावरूनच कळतं अशीही घणाघाती टिका नितेश राणे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane, Sanjay Raut
Nana Patole News: गांधी कुटुंबाला मोदी सरकार घाबरते; पटोलेंची उडवली खिल्ली

संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना या गोष्टी कळणार नाहीत अशा शब्दात नितेश राणे यांनी समाचार घेतला आहे.आमंत्रणावरून कधीच आम्ही राजकारण केले नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केलं होतं, या वक्तव्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टच्या सातबारावर ठाकरेंनी सातबाऱ्यावर नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का असा सवाल करत मी याची शंभर उदाहरण देऊ शकतो असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तेव्हा सगळे सिद्धिविनायक ट्रस्ट हे ठाकरेसाठी व पाटणकर कुटुंबियाकरीता चालत होते, असा आरोप करीत अयोध्येच्या सातबारा वरून टिका करणाऱ्या राऊतांना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल बोलताना महाराष्ट्राच्या हितासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, असे सांगितले. ते दोघेही जुने शिवसैनिक आहेत दोघेही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राला फायदाच होईल, असे राणे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे काय उद्धव ठाकरे यांच्यासारखे स्वतःच्या मेहुण्याला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना भेटत नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना सुनावत राज व मुख्यमंत्री यांच्या भेटीचा त्यांनी स्वागत केले आहे.

Nitesh Rane, Sanjay Raut
BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com