MLA Rajan Salvi : आमदार राजन साळवी ACBच्या ट्रॅपमध्ये

ACB notice to Rajan Salvi : राजन साळवींना ACBची पुन्हा नोटीस, भाऊ दीपक साळवी यांना सोबत घेऊन हजर होण्याची सूचना
Rajan Salvi
Rajan SalviSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News :

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना आज पुन्हा अँटी करप्शन ब्यूरोनी नोटीस पाठवली आहे. काल (१८ जानेवारी) एसीबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज पुन्हा नोटीस पाठवल्याने आमदार साळवी एसीबीच्या सापळ्यात अडकल्याची चर्चा आहे. यावर ही अटकेपूर्वीची कारवाई असावी, अशी प्रतिक्रिया आमदार साळवी यांनी दिली आहे.

राजन साळवी (Rajan Salvi) हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. काल सकाळी एसीबीने (ACB) राजन साळवी यांच्या निवासस्थानासह तीन ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. त्यानंतर साळवींसह त्यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर आज रत्नागिरीच्या अँटी करप्शन विभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत चव्हाण यांनी आमदार राजन साळवी यांना पुन्हा नोटीस बजावली.

Rajan Salvi
ACB Raid On Rajan Salvi : राजन साळवींवरील कारवाई सूडबुद्धीतून; विनायक राऊतांचा आरोप

आमदार साळवी यांनी 22 जानेवारीला बंधू दीपक साळवी यांना घेऊन रत्नागिरीच्या (Ratnagiri) अँटी करप्शन कार्यालयात हजर राहण्याची ही नोटीस आहे. त्यामुळे सोमवारी (22 जानेवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आपण अँटी करप्शनच्या पोहचू, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी गुन्हा दाखल केल्यामुळे 22 जानेवारीची चौकशी ही आपल्या अटकेपूर्वीची कारवाई असावी, असा संशय आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा एसीबीचा संशय आहे. यापूर्वी आमदार साळवी यांना एसीबीने सहा नोटीस पाठवल्या होत्या आणि प्रत्येकवेळी आमदार साळवी चौकशीला सामोरे गेले होते. त्यांची यापूर्वी अलिबागच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी आमदार साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानाची एसीबीने झाडाझडती घेतल्यानंतर दिवसभर त्यांची चौकशीही करण्यात आली. दीड वर्षापासून रायगड अँटी करप्शनकडून राजन साळवी आणि त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. दरम्यान, कालच्या झाडाझडतीनंतर आमदार साळवींच्या समर्थकांनी निवासस्थानासमोर शिंदे सरकार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. शिवाय आज शहरात बॅनर लावून राजन साळवींना वाघाची उपमा दिली आहे. अशातच आता रत्नागिरी शहरात आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'वाघ एकला राजा, बाकी सगळा खेळ माकडांचा...' अशा स्वरूपाच्या बॅनरबाजीतून विरोधकांना सूचक इशारा दिल्याचे बोलेले जाते.

(Edited by Avinash Chandane)

Rajan Salvi
Politics in Kokan : 'वाघ एकला राजा, बाकी सगळा खेळ माकडांचा...' एसीबीच्या धाडीनंतर साळवींनी दाखवली झलक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com