Narayan Rane News : ''दोन महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार''

Vaibhav Naik News : आमदार वैभव नाईक यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका
Narayan Rane News
Narayan Rane NewsSarkarnama

Narayan Rane News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. राणेंचे मंत्रिपद लवकरच जाणार असल्याचे भाकित नाईक यांनी व्यक्त केले आहे. नाईक यांनी यावेळी नितेश राणेंवरही हल्लाबोल केला.

येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचे नाईक म्हणाले. आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणेंचे राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपला (BJP) राणेंची राजकीयदृष्ट्या गरज राहिली नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार, असल्याचा मोठा गौप्यस्फोट नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

Narayan Rane News
Ahmednagar : नगर जिल्हा बँकेतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी; फुटीर संचालकावर कारवाई होणार?

ईडी प्रकरणात विरोधकांना उपदेश देणाऱ्या आमदार नितेश राणे यांनाही वैभव नाईक यांनी टोला लगावला. आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आलेल्या ईडी नोटीसीनंतर पक्ष का बदलला हे वडिलांना विचारावे. त्यांनी असी काय तडजोड केली की त्यांची चौकशी थांबली. हे त्यांनी जनतेला सांगावे. मग इतरांना उपदेश द्यावे, असा टोलाही वैभव नाईक यांनी नितेश राणेंना लगावला.

Narayan Rane News
Jalgaon District Bank : आमचाच एक गद्दार झाला; अन्यथा पराभव अशक्य होता : खडसेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

बैभव नाईक यांनी केलेल्या नारायण राणे यांच्या मंत्रीपदाच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. मात्र, कोकणात शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट आणि राणे यांच्यामध्ये नियमीत आरोप-प्रत्योरोप होत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com