KonkanPolitics: राऊतांनी आपलं डिपॉझिट वाचवावं, राणेंच्या सभेपूर्वी मनसे नेत्याचा इशारा

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मनसे पदाधिरी, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नारायण राणेंच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरण्याचा राज ठाकरे यांचा संदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवला आहे.
KonkanPolitics
KonkanPoliticsSarkarnama
Published on
Updated on

भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातील विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) याच्यासोबत त्यांची लढत आहे.

नारायण राणे यांचे एकेकाळचे शिवसेनेतील जुने मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त भाजपचा पाठिंबा दिला आहे. त्यांनंतर मनसे आता राणेंना विजयी करण्यासाठी कोकणात मैदानात उतरली आहे. नारायण राणेंच्या (Narayan Rane) सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. सभेपूर्वी या संदीप देशपांडे आणि सरदेसाई यांनी विनायक राऊतांना आव्हान दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी स्वत:राणेंच्या विजयासाठी कंबर कसली आहे. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची रत्नागिरीमध्ये (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency 2024) जाहीर सभा होणार आहे. शिर्के हायस्कूलजवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे हे निशाण्यावर असणार आहे.

या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), प्रकाश महाजन, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, वैभव खेडेकर रत्नागिरीत येत आहेत. महायुतीचे उमेदवार नारायण राणे तसेच महायुतीचे अन्य नेते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.

मनसेची संपूर्ण फौज राज ठाकरे यांनी रणांगणात उतरवली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कोकण दौरा केला होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मनसे पदाधिरी, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नारायण राणेंच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरण्याचा राज ठाकरे यांचा संदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवला आहे.

"राज साहेबांच्या आदेशानुसार राणे साहेबांच्या प्रचारात आम्ही सर्वांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. राज साहेबानी पंतप्रधान मोदींना पाठींबा दिल्यानंतर इथे बरेच लोकं भुंकायला लागलेले आहेत. त्यांचं भुंकणं बंद करायला आजची सभा आहे. विनायक राऊत यांनी आपलं डिपॉझिट वाचवावं," असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

KonkanPolitics
Sanjay Raut Vs Ajit Pawar: ...तर बारामतीत अजित पवार राजदूतवर दूध विकत असते!

नितीन सरदेसाई म्हणाले, नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. नारायण राणे यांच्यासाठी या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे.मनसेची सभा चांगली होणार आहे. नारायण राणेंचा विजय नक्की होईल. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर पुढच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत,"

उद्धव ठाकरे हे 29 एप्रिल रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे याच वेळी मनसेनेदेखील आपली सभा आयोजित केली आहे. सभेच्या रुपात आता शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. रत्नागिरी शहरात संध्याकाळी सहा वाजता मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दोन वेगवेगळ्या सभा होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com