Raj Thackeray: शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत राज ठाकरेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, आज जे मी अनुभवलं ते...

Shivrajyabhishek Sohala 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की...
Shivrajyabhishek Sohala, Raj Thackeray
Shivrajyabhishek Sohala, Raj ThackeraySarkarnama

MNS News: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज शुक्रवारी (दि.२) किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज रायगडावर जावून अभिवादन केलं.

यानंतर राज ठाकरे यांनी फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. "मी अनेकदा रायगडावर गेलो. प्रत्येकवेळी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं ते विलक्षण होतं", असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Shivrajyabhishek Sohala, Raj Thackeray
Chhatrapati Shivaji Maharaj : उदयनराजेंनी घेतला सुनील तटकरेंचा समाचार; म्हणाले...

काय आहे राज ठाकरे यांचे ट्वीट?

"३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्यानिमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं. महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यानिमित्ताने तेव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा.

तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजूनही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील. मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती...

हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे. तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना", असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com