Chhatrapati Shivaji Maharaj : उदयनराजेंनी घेतला सुनील तटकरेंचा समाचार; म्हणाले...

Shivrajyabhishek Sohala 2023 : आळशी विरोधकांना फक्त नावे ठेवता येतात
Sunil Tatkare, Udayanraje Bhosale
Sunil Tatkare, Udayanraje BhosaleSarkarnama

Udayanraje Bhosale on Sunil Tatkare : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात आज शुक्रवारी (दि.२) पार पडला. होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्त उपस्थित राहिले. दरम्यान, या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे तडकाफडकी बाहेर पडले. या सोहळ्याच्या आयोजनावरुन ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या कृतीची खासदार उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) रायगडावरील शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यातून तडकाफडकी बाहेर पडले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तटकरे म्हणाले, "रायगडावरील कार्यक्रम हा राजकीय वाटला. या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात अनेक त्रुटी आहेत. यावेळी मीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व लोकसभेत करतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) मावळा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होतो. पण हा कार्यक्रम राजकीय वाटला."

Sunil Tatkare, Udayanraje Bhosale
Ahmednagar Politics : ''...तर आनंद द्विगुणित झाला असता!''; नगरच्या नामांतरानंतर आमदार जगतापांनी छेडला विभाजनाचा मुद्दा

यावेळी तटकरे यांनी स्वाभिमानी मावळा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "राज्य शासनाच्या कार्यक्रमात राजशिष्टाचार असतो. आज मात्र माझ्यासाठी राजशिष्टाचार अजिबात महत्वाचा नाही. कारण मी एक शिवभक्त, मावळा म्हणून याठिकाणी उपस्थित आहे. मात्र, त्यानंतरही एखादा राजकीय विचार धरुन कार्यक्रम सुरु झाल्याचे जाणवले. त्यावेळी मला वाटले की शिवरायांना अभिवादन करावे आणि आपण कार्यक्रमातून बाहेर पडावे. कारण मीही रायगडचा एक स्वाभिमानी मावळा आहे."

खासदार तटकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेचा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी समाचार घेतला आहे. उदयनराजे म्हणाले, "खासदार सुनील तटकरे आता कोणत्या पक्षाती आहेत ? हा कार्यक्रम राजकीय असता तर त्यांना कार्यक्रमाला बोलवले असते का? हा कार्यक्रम शासकीयच होता. त्यातूनच त्यांना निमंत्रित करण्यात आले होते." यानंतर उदयनराजे यांनी आपला मोर्चा या कार्यक्रमावर टीका करणाऱ्या विरोधकांकडे वळविला.

Sunil Tatkare, Udayanraje Bhosale
Shivrajyabhishek : रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय, सरकारवर तुटून पडले अमोल मिटकरी...

उदयनराजे भोसले म्हणाले, शिवरायांचे वारंवार नाव घेता, मात्र त्यांनी कधी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले नाही. त्यांना कुणी थांबवले होते का? त्यांचे कुणी हात धरले होते का? आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी कुणी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर त्यांना कुणी नावे ठेवण्याचे कारणच काय? आळशी लोक फक्त नावे ठेवण्याचेच कामे करू शकतात."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com