पवारांवरील टीका राणे बंधुंच्या अंगलट; ४ महिन्यात होणार चौथ्यांदा कारवाई

Daoud Ibrahim | Sharad Pawar | NCP | Rane Brothers : राणे बंधुंसाठी पोलिसांचा पुन्हा कारवाईचा बडगा
Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail
Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets BailSarkarnama

मुंबई : मागच्या चार महिन्यांमध्ये संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ला प्रकरण, अधीश आणि नीलरत्न बंगल्यावरील कारवाई, दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणातील चौकशी अशा लागोपाठच्या घटनांमध्ये अडचणीत असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बेधुट आरोप आणि अत्यंत खालच्या दर्जाची टीका केल्याच्या आरोपांवरुन नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. याच आक्रमकतेचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान निलेश राणे यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जोडले होते. शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणेंनी केले होते.

Nilesh Rane Reacts After Nitesh Rane Gets Bail
मला देवाने दुरदृष्टी दिली म्हणून मी भाजपमध्ये गेलो

तर ९ मार्चच्या आझाद मैदानात मोर्चादरम्यान नितेश राणे पवारांवर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com