काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांच्या यादीत रामदास कदमांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते!

त्यांच्याकडून पक्षनिष्ठा वगैरेच्या अपेक्षा सामान्य शिवसैनिकांनी ठेवू नये.
Ramdas Kadam
Ramdas KadamSarkarnama

रत्नागिरी : शिवसेनेमधून नारायण राणे (Nilesh Rane) बाहेर पडले तेव्हा, काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांसह तेरा जणांच्या यादीमध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. दादा मी खेडमध्ये जातो आणि कार्यकर्त्यांशी बोलतो. नंतर आपण बॉम्ब टाकूयात, असे सांगून तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरुन कदम बाहेर पडले होते, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी सांगितले. (Neele Rane criticizes Ramdas Kadam)

पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यासंदर्भातील त्या क्लिपमधील आवाज रामदास कदम यांचाच आहे. खोटे बोलण्याची त्यांची खोड जुनीच असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑडिओ क्लिप कदम यांच्या आवाजातील असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कदम यांना निमंत्रण दिले गेले नव्हते. या मुद्दावरून राणे यांनी रामदास कदम यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, ''शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा आमचा निर्णय झाला, तेव्हा काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची यादी तयार केली जात होती. त्यावेळी पहिल्या क्रमांकावर कदमांचे नाव होते. परंतु आयत्यावेळी कदम यांना फोन आला आणि विरोधी पक्षनेतेपद देतो असे सांगण्यात आले. तोपर्यंत आमच्याकडे निघालेले कदम महाडजवळून माघारी परतले आणि त्यांनी 'मातोश्री' वर जाऊन पद स्वीकारले. त्यांच्याकडून पक्षनिष्ठा वगैरेच्या अपेक्षा सामान्य शिवसैनिकांनी ठेवू नयेत, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

Ramdas Kadam
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय धरणार बाळसे; गृहमंत्र्यांनी केल्या 'या' सूचना

परब यांच्यासंदर्भातील आवाज हा रामदास कदम यांचाच आहे. हे कोणीही सांगायला नको. ते पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनाही भेटले होते. ते मीच कशाला भाजपचे नेतेही सांगतील. कदम खोटे बोलण्यासाठी कोणाच्याही शपथा घेतील. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तडजोडीची कामे केली. 'मातोश्री'मधून बाहेर येऊन राणे यांच्यावर बोलण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळेच विरोधी पक्षनेत्याला महाराष्ट्र विसरला, असे हल्लाबोल नीलेश राणे यांनी केला.

Ramdas Kadam
काही लपवायचं तर, नाही ना? महापालिकेच्या प्रेक्षक गॅलरीत कोल्हेंनी ठोकला चार तास तळ

आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी रत्नागिरीत भाजपसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष भाजपचाच असेल. कोकणी लोक शिवसेनेवर प्रचंड वैतागलेले आहेत. त्यामुळे एका झटक्यात नाही, परंतु भविष्यात प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेत दिसून येईल, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com