Nilesh Rane : रत्नागिरीत राणे विरुद्ध सामंत वाद पुन्हा पेटला! निलेश राणेंचा इशारा

Nilesh Rane Vs Uday Samant : रत्नागिरीच्या समस्येवर बोलण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत घुसलेली माणसे ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती. त्यांनी तेथे जमलेल्या लोकांना धक्काबुक्की केली, असे निलेश राणे म्हणाले.
Nilesh Rane Uday Samant
Nilesh Rane Uday Samant sarkarnama
Published on
Updated on

Nilesh Rane News : लोकसभा निवडणुकीपूर्वी उदय सामंत आणि नारायण राणे एकत्र आल्याचे चित्र होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी मतदारसंघात सामंत बंधुंनी मदत केली नसल्याचे आरोप निलेश राणे यांनी केला होता तसेच रत्नागिरीमध्ये भाजपचा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीच्या समस्यांविषयी आयोजित केलेली सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी उधळून लावली. त्यामुळे या वादात निलेश राणे यांनी उडी घेतली आहे.

लोकांना बोलून द्यायची नाही ही कुठली पद्धत. व्यवस्थेवर चर्चा तर होणारच आणि अशा चर्चासत्रात मीसुद्धा उपस्थित राहणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. लोकांना गप्प करण्याची दडपशाही चालू देणार नाही, असे देखील राणे यांनी ठणकावले आहे.'ती' गु्न्हेगारी पार्श्वभूमीची माणसं

रत्नागिरीच्या समस्येवर बोलण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत घुसलेली माणसे ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती. त्यांनी तेथे जमलेल्या लोकांना धक्काबुक्की केली.सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती. त्यांना बोलू दिले नाही, असे निलेश राणे म्हणाले.

Nilesh Rane Uday Samant
Chandrashekhar Bawankule On Pawar : 'वादग्रस्त विधान करण्यापेक्षा समाजात...' ; शरद पवारांचा उल्लेख करत बावनकुळेंचं विधान!

'ती' गु्न्हेगारी पार्श्वभूमीची माणसं

रत्नागिरीच्या समस्येवर बोलण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत घुसलेली माणसे ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती. त्यांनी तेथे जमलेल्या लोकांना धक्काबुक्की केली.सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती. त्यांना बोलू दिले नाही, असे निलेश राणे म्हणाले.

Nilesh Rane Uday Samant
Raju Shetti News : एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांनी 'स्वाभिमानी' सोडली ; शेट्टींपुढे आता शेतकरी चळवळ टिकवण्याचं आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com