Raju Shetti News : राजू शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रणशिंग फुंकले; रायगडावरून शेतकरी जनजागृती अभियानास सुरुवात...

तीन महिने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांत गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे
Farmers Awareness Campaign
Farmers Awareness Campaign Sarkarnama
Published on
Updated on

Swabhimani Shetkari Sagatna : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची धोरणे ही शेतकरीविरोधी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यकर्ते सत्ता उपभोगत आहेत, मात्र त्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे. या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तीन महिने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांत गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी किल्ले रायगडावरून केली. (Organized Farmers Awareness Campaign on behalf of Swabhimani Shetkari Sagatna)

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता. १ जुलै) किल्ले रायगडावरून (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर राज्यव्यापी आंदोलनातून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जेरीस आणू, असा इशाराही राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

Farmers Awareness Campaign
Aadhaar-PAN Link Fine : आधार-पॅन लिंक दंडावरून आमदार कपिल पाटलांचे निर्मला सीतारामन यांना पत्र...

किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाचा प्रारंभ शनिवारी (ता. १ जुलै) झाला. त्यावेळी शेट्टी म्हणाले की, ‘राज्यातील शेतकऱ्यांना ऊस, कापूस आणि सोयाबीनच्या नफ्या-तोट्याचे गणित माहितीपुस्तक आणि सभांद्वारे समजावून सांगणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचेही महत्त्व ओळखून त्यांना सुखी ठेवण्याचे धोरण राबवले, मात्र त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण राबवले आहे.

Farmers Awareness Campaign
Aaditya's Attack on Shinde Group : तुम्ही मला पप्पू बोललात ना....या पप्पूचे तुम्हाला चॅलेंज या अंगावर...! ; आदित्य ठाकरेंचा मोर्चात आक्रमक मूड

शेतकरी महसूल देत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. उलट शेतकऱ्याच्या जीवावरच सगळे उद्योगधंदे चालतात आणि सरकारला महसूल मिळतो. यामुळे शेतकऱ्याला लाभदायी धोरण राबवण्याची गरज आहे. सरकारला वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे, असेही शेट्टी यांनी नमूद केले.

किल्ले रायगड परिसरात प्रचंड पाऊस असतानाही स्वाभिमानीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जालंदर पाटील, महेश खराडे, तात्या बालवाडकर, पोपटराव मोरे, पूजा मोरे, वैभव कांबळे, सुभाष शेट्टीअमर कदम, संदीप जगताप आदींसह राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Farmers Awareness Campaign
Shinde-Fadnavis Givernment : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात अशोक चव्हाण आक्रमक ; 'या' आयुधाचा वापर करणार

शिवरायांच्या पुतळ्यासमोर मांडली कैफियत

‘राजे, तुम्ही या रायगडावर बसून प्रजेला न्याय दिला; परंतु आजचे राज्यकर्ते आपले नाव फक्त सत्ता उपभोगण्यासाठी घेत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आजपासून हे जागृती अभियान सुरू करीत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी प्रजेला सूज्ञ करण्यासाठी रायगडावरून सुरुवात करीत आहोत,’ असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सदरेवरील पुतळ्यासमोर शेट्टी यांनी कैफियत मांडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी, असे साकडे घातले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com