Shivsena Morcha : रस्त्याच्या कामाबाबत मी सत्य परिस्थिती सांगत असताना माझ्यावर भाजपवाले, मिंदे गट तुटून पडला हेाता. मी म्हटलं, ‘चला तुम्ही मला पप्पू बोलतात ना... हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतो...या माझ्या अंगावर.... एकटे या, संपूर्ण फौज घेउन या, आहे तयारी माझी. छातीवर वार करायला या, अशा प्रचंड आक्रमक शैलीत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. (Aaditya Thackeray's Shinde group and challenge to BJP)
शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुंबई पालिकेवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढण्यात आला. त्यात मोर्चाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे म्हणाले की, मुंबईत रस्ते घोटाळा मोठ्या प्रमाणत झाला आहे. हा घोटाळा तुमच्या आमच्या पैशातून झला आहे. मला येताना विचारलं होतं की, तुम्ही निवदेन देणार आहात का. मी सांगितलं चोरांना काय निवेदन द्यायचं. त्यांना आज सांगून ठेवतोय, तुमची चोरी आमच्या नजरेत आलेली आहे. तुमच्या फाईल बनवलेल्या आहेत, ज्या दिवशी आमचं सरकार आलं, त्याच दिवशी आम्ही आणि पोलिस आत येणार आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार. पुढच्या फाईलवर सही करताना लक्षात ठेवा, तुम्ही काय करताय. या मुंबईला लुटू नका. दिल्लीचे कितीही आदेश आले तर आम्हाला लुटू नका.
आम्ही सगळे रस्ते काँक्रीटचे करणार, असे घटनाबह्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्हाला माहिती आहे की, मुंबईत किती रस्त्यांची डागडुजी करता येते, नवीन रस्ते किती करत येतात. मुंबईतील रस्त्याखाली ४२ वेगवेगळे घटक आहेत. त्यांना सर्वांना सांगून हे काम करावे लागते. पोलिसांना विचारावं लागतं. सोळा वेगवेगळ्या एजन्सीशी बोलून रस्ते करावे लागतात. पण आमचे घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी त्याचा कधी विचारच केला नाही. मंत्रीपदाचा अनुभव जरी सात वर्षांचा असला तरी त्यांनी खात्यात कधी बघितलंच नव्हते, त्यांनी सांगितले की आम्ही एका रात्रीत … जसं एका रात्रीत चाळीस आमदार पळाले, तसं ४०० किलोमीटरचे रस्ते आम्ही करून दाखवू, असे त्यांनी सांगितले हेाते, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
त्यांचे पाच कॉन्ट्रक्टर मित्र आहेत. त्यांच्यासाठी बरोबर पाच पाकिटे बनवली. झोनमध्ये त्यांनी कामं वाटून घेतली. पहिल्यांदा पाच हजार कोटीचं टेंडर काढलं. पण एकाही मित्राने ते भरले नाही. त्यामुळे पुन्हा टेंडर काढावं लागलं. मित्र आले नाहीत; म्हणून टेंडर रद्द करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांना फोन करून ते टेंडर ६०८० कोटीपर्यंत नेले. त्या ठेकेदाराचा ४० टक्के फायदा करून देण्यात आला. त्यानंतरही १८ टक्के वाढ करून देण्यात आली. त्यातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांच्या खिशात किती कोटी गेले असतील, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
काम सुरू होण्यापूर्वीच ठेकेदाराला ६०० कोटी देणार होते...
माझ्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना पहिल्यांदा चारशे कोटीचं नुकसान झालं. रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच ते ठेकेदारांना ६०० कोटी रुपये देणार होते. मात्र, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर ते ६०० कोटी रुपये देण्याचेही रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ५० रस्ते करणार असल्याचे जाहीर केले. पण पन्नास रस्तेही तुम्ही करू शकणार नाही, हे सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.