Accident News : गुरुवार ठरला अपघाताचा दिवस ; तेरा जणांचा मृत्यू ; दैव बलवत्तर म्हणून ५ महिन्यांचे बाळ बचावले..

Raigad Kankavli Accident News : रायगडमधील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कणकवली येथे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
raigad kankavli accident News update
raigad kankavli accident News updatesarkarnama

Accident News : रायगड आणि कणकवली अपघातामुळे गुरुवारचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरला आहे. दोन भीषण अपघाताच्या बातमीने गुरुवारीची सकाळ उगवली.

रायगड (raigad) आणि कणकवलीमध्ये (kankavli)आज पहाटेच भीषण अपघात झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या दोन भीषण अपघातात वाहनांचा चुराडा झाला आहे.

आज पहाटेच दोन्ही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावर झाले. त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रायगडमधील अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कणकवली येथे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

raigad kankavli accident News update
Narendra Modi News : मोदींचे मराठीतून टि्वट , म्हणाले, "मी मुंबईत असेन.."

रेपोली गावाजवळ (रायगड) कार आणि ट्रकचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. यात 4 महिला असल्याची माहिती आहे. अपघातात पाच महिन्यांचे बाळ बचावल्याचे पोलसांनी सांगितले.

अपघातात एक चार वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे. जखमी मुलाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

raigad kankavli accident News update
PMC Budget News : जी-20 मुळे महापालिकेचा अर्थसंकल्प गेला महिनाभर पुढे

कणकवली येथे एक खासगी बस उलटून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक पहाटेच हा देखील अपघात झाला. या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत.त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही बस मुंबईहून गोव्याला जात होती. कणकवलीत गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. यातील 4 जण ठार झाले आहेत. तर, 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com