Raigad Lok Sabha 2024: मतदारांना चकवा; रायगडमध्ये तीन गीते, तर दोन तटकरे रिंगणात; विरोधक करताहेत एकमेकांची कोंडी...

Maharashtra Lok Sabha Election 2024: तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1991 च्या निवडणुकीत शेकापच्या दत्ता पाटील यांनाही नाव साधर्म्यामुळे फटका बसला होता.
Raigad Lok Sabha 2024:
Raigad Lok Sabha 2024:Sarkarnama

Raigad News: मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रायगडमध्ये तीन गीते, दोन तटकरे (तटकरे, तटकरी) यांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून (Mahayuti) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अनंत गीते (Anant Geete) हे रायगडमध्ये लढत आहेत.

या दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यामुळे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना फटका बसणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात आहे. सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने अर्ज दाखल केला आहे.

महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन अनंत गीते यांनीही अर्ज भरला आहे. अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची विरोधकांनी कोंडी केल्याचे बोलले जाते.

सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता, त्याला ९ हजार ८४९ मते मिळाली होती. यामुळे तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1991 च्या निवडणुकीत शेकापच्या दत्ता पाटील यांनाही नाव साधर्म्यामुळे फटका बसला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raigad Lok Sabha 2024:
Raosaheb Danve News: हवा, टायर अन् पंक्चर.. दानवेंनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला सल्ला..

रायगड लोकसभेतील उमेदवार

  • अनंत गंगाराम गीते (शिवसेना ठाकरे गट )

  • अनंत पद्मा गीते (अपक्ष)

  • अनंत बाळोजी गीते (अपक्ष)

  • सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस )

  • सुनील तटकरी ( अपक्ष )

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com