Raj Thackeray News : पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख, म्हणत राज ठाकरेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

Raj Thackeray Konkan News : राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
MNS Raj Thackeray Latest Marathi News
MNS Raj Thackeray Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Ratnagiri News : इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणे इतकेच इथल्या लोकप्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे. हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच, असे मत महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे यांची कोकणातील रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधळा. शिवसेनेची भूमिका नक्की आहे आहे रिफायनरींबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसे होईल, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता, राज ठाकरे यांनी लगावला. तसेच शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल ही त्यांनी केला.

MNS Raj Thackeray Latest Marathi News
Raj Thackeray News राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; बाळासाहेबांच्या नावावर मुंबईचा महापौर बंगला ढापला...

तसेच इथल्या लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. मात्र, आपण दुर्लक्ष केले. २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आले होते. मात्र, आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतके वैविध्य असलेले कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचे अर्थकारण कोकण चालवेल. मात्र, कुणाला काहीच घेणेदेणे नाही.

MNS Raj Thackeray Latest Marathi News
Uddhav Thackeray News : 'येणाऱ्या निवडणुकीत महाडमध्ये ठाकरे गटाचाच आमदार निवडून येईल'

माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करण्या पेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचे खरे स्मारक आहे, त्यांचे आधी संवर्धन करा हे माझे म्हणणे होते. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या. अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचे मला खूप वाईट वाटते, राग येतो.

MNS Raj Thackeray Latest Marathi News
Uddhav Thackeray : ठाकरेंनी शिंदे गटातील आणखी एका आमदाराला घेरले; गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात जगतापांचा प्रवेश अन् सभाही...

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते ते पेशव्यानी पूर्ण केले ते म्हणजे आपला भगवा झेंडा अटकेपार फडकवला. म्हणजे कुठे थेट पाकिस्तानमधल्या अटक किल्ल्यापर्यंत फडकवला. म्हणजे काय केले तर जमीन ताब्यात घेतली. थोडक्यात जमिनीचे महत्व कमी लेखू नका, असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com