Raj Thackeray On Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरे भडकले, म्हणाले, ''....हे कसलं प्रशासन ?

Raigad Irshalwadi Landslide : '' खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण...''
Raj Thackeray Irshalwadi Landslide
Raj Thackeray Irshalwadi Landslide Sarkarnama
Published on
Updated on

Raigad : रायगडमधील इर्शाळवाडीत बचावकार्यात सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र, प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. '' जर कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन?'' असा सवाल करत ठाकरेंनी प्रशासनाला धारेवर धरले.

इर्शाळवाडी(Irshalwadi)तील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेवर राज यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा व्यक्त केली आहे.

Raj Thackeray Irshalwadi Landslide
Parliament Session : पंतप्रधान मोदींना विरोधकांनी दिली हाक; अधिवेशनात नेमकं काय घडलं ?

राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत अशी इच्छा राज यांनी व्यक्त केली. त्याचवेळी अशा घटनांचा प्रशासनासारख्या यंत्रणांना अंदाज का आला नाही याकडे लक्ष वेधून, त्यांनी व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केले.

ट्विटमध्ये राज ठाकरेंनी काय म्हटलंय..?

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून मनसैनिकांना इर्शाळवाडीतील दुर्घटनेत मदतकार्य करण्याचं आवाहन देखील केलं आहे. ते म्हणाले, दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे पाहावं असं म्हटलं आहे. (MNS News)

Raj Thackeray Irshalwadi Landslide
NCP Crisis: दे धक्का ! शरद पवारांना पुन्हा हादरा; नागालँडच्या सात आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

याचवेळी त्यांनी खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की, कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा असंही राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

(Edited By DeepaK Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com