Rajan Salvi On Ramdas Kadam : 'बाळासाहेबांमुळे वाल्याचा वाल्मीकी, नाहीतर...' ; साळवींनी कदमांना फैलावरच घेतले!

Rajan Salvi On Ramdas Kadam : "पन्नास खोके-एकदम ओके..."
Rajan Salvi On Ramdas Kadam
Rajan Salvi On Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Konkan News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पन्नास खोक्यांचा आरोप सिद्ध करा, अन्यथा भांडी घासायला तयार राहा, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला होता. या टीकेनंतर तर आता कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी रामदास कदम यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

'जर का शिवसेना व बाळासाहेब ठाकरे हे अक्षर तुमच्या मागे नसते तर आज रामदास कदम तुम्ही कुणीकडे असतात? याचा विचार करा, असा इशारा राजन साळवी यांनी दिला आहे. बाळासाहेबांमुळे वाल्याचा वाल्मीकी झाला, अन्यथा आज रामदास कदम कुणीकडे असते, याचा त्यांनी विचार करावा. पन्नास खोके-एकदम ओके ही तर घोषणा आता प्रचलित झाली आहे, असा इशारा राजन साळवी यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajan Salvi On Ramdas Kadam
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? पाहा भुजबळांनी पवारांना कसं डिवचलं...

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यामुळे आज ही सगळी मंडळी आहेत. रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांना नेते, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी सगळी पदं बाळासाहेबांमुळे मिळाली. याचा त्यांनी विसर पडू देऊ नये, अशी आपली अपेक्षा आहे. राजन साळवी यांनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपकडे आता वॉशिंग मशीन आहे. ईडी असू दे अथवा कोणतेही आरोप असू देत भाजपमध्ये गेलात की ते सगळे स्वच्छ होतात. त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे." येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असल्याची टीकाही राजन साळवी यांनी केली आहे.

Rajan Salvi On Ramdas Kadam
Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 'एमआयएम'च्या पतंगाला नांदेडमध्ये हवा ?

"भाजपमध्ये आता अन्य पक्षांतून नेते प्रवेश करत आहेत. त्यामुळे आता भाजपच्या (BJP) नेतृत्वाला आता माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्या मुलाकडूनच घरचा आहेर मिळाला आहे. माझे वडील माधव भंडारी यांचे नाव नेहमी राज्यसभेसाठी विधान परिषदेसाठी असायचं. मात्र, नंतर ते कट व्हायचं, असा थेट घरचा आहेरच माधव भंडारी यांच्याच मुलाने भाजपला दिला आहे, अशीही उपरोधिक टीका साळवी यांनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com