Kokan Politics: प्रचारासाठी अवघे 12 दिवस शिल्लक; आघाडीमध्ये निराशा, तणाव; कोकणात काय चाललंय...

Ratnagiri Assembly Constituency election 2024 : महाविकास आघाडी जोमाने कामाला लागली असून उद्धव ठाकरे यांची पहिली प्रचार सभा नुकतीच झाली; पण आघाडीमध्ये नियोजन आणि ताळमेळ नसल्याची चर्चा सुरू आहे.
Ratnagiri Assembly Constituency election 2024
Ratnagiri Assembly Constituency election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News: प्रचारासाठी अवघे 12 दिवस बाकी असताना कोकणात मात्र राजकीय वातावरण थंड आहे. महायुतीमधील समज-गैरसमज दूर करण्यात काही प्रमाणात रवींद्र चव्हाण यशस्वी झाले असले तरीही महाविकास आघाडीत अजूनही समन्वयाचा अभाव आहे. आघाडीत निराशा, तणाव आणि बुचकळ्यात टाकणारी स्थिती आहे.

शिवसेनेकडून विद्यमान आमदार उदय सामंत तर महाविकास आघाडीकडून बाळ माने यांच्यात खरी लढत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार बाळ माने हे "एकला चलोरे'च्या भूमिकेत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नैराश्य आणि निरुत्साहाचे वातावरण आहे.

Ratnagiri Assembly Constituency election 2024
Supriya Sule: अजितदादांना 'करारा जबाब' देत सुप्रियाताई म्हणाल्या, "भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार..."

महाविकास आघाडी जोमाने कामाला लागली असून उद्धव ठाकरे यांची पहिली प्रचार सभा नुकतीच झाली; महाविकास आघाडीमध्ये नियोजन आणि ताळमेळ नसल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत थेट वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडेही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेसेनेत नाराजीनाट्य रंगू शकते.

Ratnagiri Assembly Constituency election 2024
Ambadas Danve: तानाजीराव, किती प्रॉम्पटिंग करायचं! अरे, मुख्यमंत्र्यांना काही तरी बोलू द्या! VIDEO पाहा

उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेवेळीही अंतर्गत धुसफूस सुरू होती. याबाबत काही पदाधिकाऱ्यांमध्ये उघड उघड चर्चाही झाली. त्यामुळे ठाकरेसेनेत मूळ पदाधिकारी आणि बाळ माने यांच्यात शेवटपर्यंत समन्वय राहणे हेच मोठे आव्हान आहे. रत्नागिरी मतदार संघात निष्ठावंताला संधी मिळालीच पाहिजे, असे मत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते.

आयत्यावेळी मातोश्रीवरून निर्णय बदलला आणि निष्ठावंत उदय बने यांना डावलून भाजपमधून आलेल्या बाळ माने यांना रत्नागिरीतून संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज उदय बने यांनी पक्षाचे कामच थांबवले आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. मातोश्रीच्या आदेशावर ठाकरेसेना चालत असल्यामुळे रत्नागिरी मतदारसंघात ताकद असलेल्या पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा निर्धार केला. बाळ माने यांना सामावून घेतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com