जिल्हा परिषदेत असं पहिल्यांदाच घडलं! सभा चालू असतानाच अधिकाऱ्याचा पदभार काढला

जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एका अधिकाऱ्‍याचा पदभार समितीची सभा चालू असताना काढून घेण्यात आला.
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad Sarkarnama
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा चांगलीच असून, जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) इतिहासात प्रथमच एका अधिकाऱ्‍याचा पदभार समितीची सभा चालू असताना काढून घेण्यात आला. मागील पंधरा दिवसात विविध विकासकामांच्या फाईलवर सह्या न करणाऱ्‍या प्रभारी अधिकाऱ्‍यांना सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आर्थिक वर्ष संपत असताना कामे होत नसल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) प्रभारी अधिकाऱ्यांना दणका दिला.

सभापती परशुराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा पदभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी चिकणे यांच्याकडे आहे. सभेला प्रभारी अधिकारी चिकणे जिल्हा परिषदेत उशिरा दाखल झाले. त्यांच्याकडून सभेत कोणतीच माहिती देण्यात आली नाही. यालट त्यांनी लेखी सूचनांची मागणी सदस्यांकडे केली. यावरुन सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभापती, सदस्यांचा हा अवमान असल्याचा सूर सभागृहात व्यक्त झाला. या वेळी संतोष थेराडे, दीपक नागले, विनोद झगडे, सुनील तोडणकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Ratnagiri Zilla Parishad
योगीच्या नादाला लागणं शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना पडलं महागात; कारवाईचा आवळला फास

मार्चअखेर आणि पंचवार्षिक मुदत संपत आल्यामुळे सदस्यांची शेवटच्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यावर अधिकारी वेळेवर सह्या करीत नसल्यामुळे कामे होत नाहीत, अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. चिकणे यांनी सदस्यांकडेच लेखी सूचानांची केलेली मागणी हा सदस्यांचा अवमान असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी यादव यांच्याकडे करण्यात आली . सभा चालू असतानाच चिकणे यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. याचबरोबर जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडे पदभार देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com