परब हल्ला प्रकरणातील सावंतांना सशर्त जामीन मंजूर

पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे या अटी संदेश सावंत (Sandesh Sawant ) यांच्यावर घालण्यात आल्या आहेत.
Sandesh  Sawant
Sandesh Sawant Sarkarnama
Published on
Updated on

ओरोस : राज्यभर गाजलेल्या शिवसैनिक (Shivsena) संतोष परब (Santosh Parab Case) हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन (Bail) मंजूर केला असून ३० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता झाली आहे.

Sandesh  Sawant
'देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागून-लागून 2014 ला शिवसेना सत्तेत आली होती'

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर शरण येण्यास गोट्या सावंत यांना दहा दिवसांची सवलत सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानुसार मुदत संपण्यापूर्वी सावंत कणकवली न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यावर त्यानंतर न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. न्यायालयीन कोठडी झाल्यावर सावंत यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याबाबतची सोमवारी (ता.21 फेब्रुवारी) सुनावणी पूर्ण झाली होती असून सावंत यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

Sandesh  Sawant
आरोपांना घाबरू नका; शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांना केले आश्वस्त!

सावंतांच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ऑनलाईन बाजू मांडली. न्यायालयाने आज (ता.22 फेब्रुवारी) यावर निर्णय दिला असून न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात जाण्यास बंदी घातली आहे. तसेच, दर सोमवारी ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे या अटीही घालण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. यामुळे शिवसेना विरूद्ध राणे असा सामना रंगला होता. यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com