Murbad Bazar Samiti News : ठाण्यात शिंदे शिवसेनेचा भाजपला दणका; मुरबाड बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व

Bazar Samiti News : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून १८ पैकी १५ जागांवर विजय मिळाला.
BJP, Shiv Sena
BJP, Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Thane politics : मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून १८ पैकी १५ जागांवर विजय मिळाला. तर भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), लोकनेते माजी आमदार गोटीराम पवार आणि शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी दिली.

BJP, Shiv Sena
Bazar Samiti Results : शिंदेंच्या मंत्र्यांना धक्का; भुसे, राठोड अ्न सावंतांचा करेक्ट कार्यक्रम; ठाकरेंची खेळी यशस्वी

मुरबाड 'एपीएमसी'वर अनेक वर्षांपासून लोकनेते गोटीराम पवार यांचे वर्चस्व आहे. २००९ नंतर मुरबाडच्या राजकारणात पदार्पण केलेल्या किसन कथोरे यांना आमदारकी हाती असूनही चौदा वर्षानंतरही बाजारसमितीवरील पवारांचे वर्चस्व मोडता आलेले नाही. आतापर्यंत बाजार समितीच्या झालेल्या सर्व निवडणुकात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

मात्र, या निवडणुकीत राज्यात शिवसेना (Shivsena) व भाजप एकत्रित असल्यामुळे मुरबाड एपीएमसी निवडणुकीत युतीची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात शिवसेना-भाजपमध्ये (BJP) चर्चाही झाली होती. शिवसेनेने भाजपला सहा जागा देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. भाजपाने सुरुवातीला सहा जागांवर मान्यता दिली होती. अचानक आणखी एका जागेची मागणी केल्यामुळे युती फिसकटली.

BJP, Shiv Sena
Sangli Bazar Samiti : जयंतरावांनी सांगलीत मंत्री खाडे अन् संजयकाकांना धुळ चारली; आघाडीची निर्विवाद सत्ता

'एपीएमसी'ची निवडणूक चुरशीची होत असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. मात्र, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांनी नियोजनबद्ध व्यूहरचना केली होती. त्यामुळे भाजपला संधी मिळाली नाही. शुक्रवारी रात्री उशीराने झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेला १८ पैकी १५, तर भाजपच्या किसन कथोरेंना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com