Shivrajyabhishek : रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय, सरकारवर तुटून पडले अमोल मिटकरी...

Amol Mitkari : राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का.
Eknath Shinde, Amol Mitkari and Devendra Fadanis
Eknath Shinde, Amol Mitkari and Devendra FadanisSarkarnama
Published on
Updated on

350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर आज मोठ्या थाटामाटात पार पडला. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात गेल्या काही दिवसांपासून सोहळ्याची जय्यत तयारी केली. या सोहळ्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहे. (Was the Shivrajyabhishek ceremony meant to promote Sanatan Dharma?)

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक दिन तिथीनुसार आज (ता. २) रायगडावर धूमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्याच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजन व आरती करण्यात आली. या सोहळ्याला किल्ले रायगडावर शिवप्रेमींचा सागर लोटला आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भल्या पहाटे गडावर दाखल झाले होते.

आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सत्तेचा गैरवापर करून तिथीनुसार हा कार्यक्रम राबविला असल्याची घणाघाती टिका त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का, असा सवाल करीत मिटकरींनी ट्विट करीत सरकारवर ताशेरे ओढले.

काय म्हटलंय ट्विटमध्ये ?

पहिल्या ट्विटमध्ये आमदार मिटकरींनी डॉ. मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. यामध्ये ते म्हणतात, ‘श्री मोहन भागवत ह्यांनी हिंदू राष्ट्र व हिंदवी स्वराज्य यातील फरक समजून घेऊन नंतर बोलावे. तुम्ही बोलाल तेच ब्रह्म वाक्य का?. तुमच्या अशाच वक्तव्यामुळे दिवसेंदिवस हिंदू धर्माची लक्तरं वेशीवर टांगल्या जात आहेत. सुधराल अशी अपेक्षा...’

Eknath Shinde, Amol Mitkari and Devendra Fadanis
Amol Mitkari News : अमोल मिटकरींनाही व्हायचंय खासदार : अकोल्यातून लढण्याची व्यक्त केली इच्छा

दुसऱ्या ट्विटमध्ये ‘ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय.’ हा मजकूर लिहीत त्यांनी शिंदे-फडणवीसांचा (Devendra Fadanvis) समाचार घेतला.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेचं स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चूक करताय. तुमचा टकमकीवरून लवकरच जनता कडेलोट करेल.’ अस आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com