Shivsena : ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या ; आता दोन बड्या नेत्यांना अँटी करप्शनची नोटीस!

Shivsena : कुडाळमधल्या अँटी करप्शनच्या कार्यालयावर धडक मोर्चासुद्धा काढण्यात आला होता.
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama

Shivsena : शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी दोन नेत्यांना आता अॅंटी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि आमदार राजन साळवी यांना अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटीशीत अलिबाग येथील अँटी करप्शन कार्यालयात ५ डिसेंवर रोजी हजर राहण्याबद्दल नमूद केलेले आहे.

बेहिशेबी संपत्तीच्या कारणावरून अँटी करप्शन ब्युरोकडून आमदार वैभव नाईक यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नाईक यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. नाईक यांनी याआधीच अँटी करप्शन ब्युरोला मेल करून वेळ मागून घेतली होती. दरम्यान वैभव नाईक यांनी कुडाळमधल्या अँटी करप्शनच्या कार्यालयावर धडक मोर्चासुद्धा काढला होता.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Nitin Gadkari : सांस्कृतिक मंत्री नसूनही सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य करत आहेत नितीन गडकरी...

यानंतर आता आमदार राजन साळवी यांना देखील अँटी करप्शनची नोटीस मिळाली आहे. 5 डिसेंबर रोजी अलिबागमधील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले गेले आहे. यामुळे आता ठाकरे गटातील नेत्यांवर पुन्हा दबावतंत्र वापरले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com